शहरं
Join us  
Trending Stories
1
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
2
दोन्ही उपमुख्यमंत्री निवडणूक रिंगणात; विठ्ठलाच्या महापूजेचा मान कोणाला मिळू शकतो? जाणून घ्या
3
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
4
फक्त २ 'परदेशी'; पंत, KL राहुल अन् श्रेयससह लिलावात सर्वाधिक मूळ किंमतीसह नाव नोंदणी करणारे खेळाडू
5
'स्विंग स्टेट्स' ठरवणार अमेरिकेचा नवा राष्ट्राध्यक्ष! ट्रम्प २० राज्यांत; कमला १० राज्यांत विजयी
6
'या' शेअरचं ट्रेडिंग बंद; कंपनीवर आहे प्रचंड कर्ज; ₹३४८ वरून ₹३४ वर आली किंमत
7
गोकुळचे माजी अध्यक्ष रवींद्र आपटे यांचे निधन; आज होणार अंत्यसंस्कार
8
अखेरची निवडणूक असल्याने माझा सन्मान राखावा; शहाजीबापू पाटलांचं जनतेला भावनिक आवाहन 
9
अल्लू अर्जुन आणि फहाद फासिल भिडणार! नवीन पोस्टर पाहून अंगावर येईल काटा
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
11
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
12
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
13
कोण होणार अमेरिकेचा अध्यक्ष ट्रम्प की हॅरिस? 40 वर्षांत ज्यांची भविष्यवाणी कधी खोटी ठरली नाही त्यांनी सांगितलं
14
US Election Share Market : ट्रम्प यांच्या पुन्हा सत्तेत येण्याचे संकेत, भारतीय शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,३०० च्या वर
15
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
16
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
17
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
18
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
19
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
20
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत

सकाळी पेपर वाटून घेतली झेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 10:10 AM

घरात आई नाही. मजुरी करणारे वडीलच दोन वेळचे जेवण तयार करतात. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी पहाटे ५ वाजता उठून वृत्तपत्रे वाटतो, तर दुपारी बिग बाजाारमधील वडापावच्या दुकानात काम करतो.

ठळक मुद्देअंकितला व्हायचेय अभियंता हलाखीच्या परिस्थितीवर मात

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मोडकळीस आलेली झोपडी. सोईच्या नावाने केवळ एक ट्युबलाईट, दोन प्लास्टिकच्या खुर्च्या. घरात आई नाही. मजुरी करणारे वडीलच दोन वेळचे जेवण तयार करतात. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी पहाटे ५ वाजता उठून वृत्तपत्रे वाटतो, तर दुपारी बिग बाजाारमधील वडापावच्या दुकानात काम करतो. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीवर मात करीत त्याने बारावीत ८८ टक्के गुण घेतले. अंकित सिद्धार्थ पाटील त्या विद्यार्थ्याचे नाव. राजाबाक्षा येथील पं. बच्छराज कनिष्ठ महाविद्यालयाचा तो विद्यार्थी आहे.बुधवारी बारावीचा निकाल समोर येताच पास झालेल्या मुलांचा एक वेगळा थाट सर्वत्र दिसून आला. कुणी त्यांना पेढे भरवित होते, कुणी हारतुरे देऊन शुभेच्छा देत होते, कुणी त्यांच्या नवनवीन मागण्या पूर्ण करीत होते तर कुणी त्यांच्यासाठी काय करू, काय नको यासाठी झटत होते. परंतु अंकितला ८८ टक्के गुण मिळवूनही त्याचे कौतुक करणारे कुणीच नव्हते. नेहमीप्रमाणे तो आपल्या बिग बाजार येथील वडापावच्या दुकानात कामावर हजर होता. निकाल पाहण्यासाठी त्याने दुपार नंतर सुटी घेतली होती. मित्रांच्या मोबाईलमधून निकाल पाहताच त्याचेच त्याला आश्चर्य वाटले. कारण अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाले होते.अंकितची भेट त्याच्या घरी झाली. त्याला बोलते केल्यावर तो म्हणाला, पाचवीत असताना आई घर सोडून निघून गेली. वडील वेल्डिंगची कामे करतात. परंतु रोज काम मिळतेच असे नाही. दोन वेळचा स्वयंपाक तेच करतात. मोठे वडील अशोक पाटील यांच्यामुळेच पं. बच्छराज शाळेत प्रवेश मिळाला. त्यांनीच शिकवणी वर्गाचा व वह्यापुस्तकांचा खर्च उचलला. अभ्यासात शाळेतील शिक्षकांचीही मोठी मदत झाली. विशेषत: अंजली तिजारे या शिक्षकेने बारावीच्या प्रश्नपत्रिका घेण्यास आर्थिक मदत केली. या सर्वांच्या मदतीमुळेच हे यश गाठता आले. दहावीत ९० टक्के गुण होते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून अंथरुणावर असलेली आजी आणि गणिताचा पेपरच्यावेळी तिचे झालेले निधन यामुळे कमी गुण मिळणार हे अपेक्षित होते, परंतु जास्तच मिळाले, असे म्हणून भावूक झालेला अंकित म्हणाला, खूप मेहनत घ्यायची तयारी आहे सर, याच बळावर अभियंता होण्याचे स्वप्न बाळगून आहे. घरची स्थिती पाहता हे कठीण असले तरी अशक्य नाही, असा विश्वास आहे.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८