लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाला न जुमानता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. या कारवाईला विरोध दर्शविण्यासाठी फेरीवाला फूटपाथ दुकानदार महासंघातर्फे हॉकर्स संघटनेचे नेते रज्जाक कुरेशी यांच्या नेतृत्वात बुधवारी महाल येथे सहायक आयुक्त अशोक पाटील यांना घेराव करण्यात आला.महापालिकेतील अधिकारी व पदाधिकाºयांच्या आदेशानुसार फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. परंतु ही कारवाई बेकायदेशीर असल्याची माहिती कुरेशी यांनी दिली. अशोक पाटील यांनी फेरीवाल्यांच्या मागण्यासंदर्भात आयुक्तांसोबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊ न चर्चा केली. नोंदणी केलेल्या फेरीवाल्यांनी नियमांचे पालन करावे असा सल्ला दिला. तसेच सहायक आयुक्तांसोबत बैठक घेऊ न यावर तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.शिष्टमंडळात गोपी आंभोरे, अविनाश तिरपुडे, संदीप गुहे, शैलेश शाहू, राजू बडीकर, सुनील जैस्वाल, आशिष जैन, इनामुरेहीम हनीफ अरशद, गुड्डू इरफान , सोनू अशफाक आदींचा समावेश होता.महाल व सक्करदरा भागातील अतिक्रमण हटविलेमहापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने बुधवारी महाल व सक्करदरा भागातील अतिक्रमण हटविले. महाल येथील केळीबाग रोडवरील अतिक्रमण हटविताना फेरीवाल्यांनी कारवाईला विरोध दर्शविला. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्यात आली. पथकाने दोन टृक साहित्य जप्त केले. छोटा ताजबाग परिसरातील २२ शेड हटविण्यात आले. तसेच २६ जानेवारीचा कार्यक्रम विचारात घेता कस्तूरचंद पार्क परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले.
नागपूर मनपा सहायक आयुक्तांना फेरीवाल्यांचा घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:06 AM
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाला न जुमानता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. या कारवाईला विरोध दर्शविण्यासाठी फेरीवाला फूटपाथ दुकानदार महासंघातर्फे हॉकर्स संघटनेचे नेते रज्जाक कुरेशी यांच्या नेतृत्वात बुधवारी महाल येथे सहायक आयुक्त अशोक पाटील यांना घेराव करण्यात आला.
ठळक मुद्दे‘ती’ अतिक्रमणे हटविली