लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतचे सदस्यता शुल्क जमा केले नाही अशा सुमारे ४०० वकिलांना निवडणूक समितीने ‘डिफॉल्टर’ ठरवले आहे. त्यामुळे संबंधित वकिलांना संघटनेच्या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. संघटनेतील १६ पदांसाठी ३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.१८ फेब्रुवारी २०१९ पूर्वीपासून संघटनेचे सदस्य असलेल्या वकिलांना थकीत सदस्यता शुल्क जमा करण्यासाठी सुरुवातीला २७ फेब्रुवारीच्या दुपारी ४.३० वाजतापर्यंत मुदत देण्यात आली होती. ती मुदत सोमवारी दुपारी १ वाजतापर्यंत वाढविण्यात आली होती. असे असताना सुमारे ४०० वकिलांनी थकीत सदस्यता शुल्क जमा केले नाही. त्यामुळे ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतचे सदस्यता शुल्क जमा केलेल्या १८०१ वकिलांची प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावरील आक्षेपांवर सुनावणी घेऊन ६ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजता अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. संघटनेच्या कार्यकारिणीत अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, ग्रंथालय प्रभारी, कोषाध्यक्ष व नऊ कार्यकारी सदस्यांचा समावेश आहे. निवडणुकीसाठी अॅड. प्रकाश मेघे, अॅड. भानुदास कुलकर्णी, अॅड. अरुण पाटील, अॅड. संग्राम सिरपूरकर व अॅड. फिरदोस मिर्झा यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
‘एचसीबीए’चे ४०० वकील ‘डिफॉल्टर’; निवडणुकीत मतदान करता येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2020 10:50 AM
हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरचे ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतचे सदस्यता शुल्क जमा केले नाही अशा सुमारे ४०० वकिलांना निवडणूक समितीने ‘डिफॉल्टर’ ठरवले आहे.
ठळक मुद्देसमितीचा निर्णय