शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

लग्न करण्यासाठी तो बनला ‘रॉ’ एजंट : मुंबई पोलिसांच्या ‘पंटर’ला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2019 11:59 PM

लग्न करण्यासाठी स्वत:ला ‘रॉ’ एजंट असल्याचे सांगून मुंबई पोलिसांच्या एका ‘पंटर’ने शहर पोलिसांची झोप उडविली. २४ तास चाललेल्या या ‘ड्रामा’नंतर युवकाचा बोगसपणा उघडकीस आला. गिट्टीखदान पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

ठळक मुद्दे२४ तास चालले नाट्य, वरिष्ठ अधिकारीही हादरले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लग्न करण्यासाठी स्वत:ला ‘रॉ’ एजंट असल्याचे सांगून मुंबई पोलिसांच्या एका ‘पंटर’ने शहर पोलिसांची झोप उडविली. २४ तास चाललेल्या या ‘ड्रामा’नंतर युवकाचा बोगसपणा उघडकीस आला. गिट्टीखदान पोलिसांनी त्याला अटक केली आहे. इमरान खान नूर मोहम्मद खान (३९) रा. शिवाजीनगर गोवंडी मुंबई, असे आरोपीचे नाव आहे.पोलीस सूत्रानुसार इमरान हा मुंबई पोलिसांचा पंटर म्हणून काम करतो. त्यामुळे त्याला पोलीस आणि गुन्हेगारी जगताची माहिती आहे. तो घटस्फोटित आहे. दोन महिन्यापूर्वी त्याची गिट्टीखदान परिसरातील एका ३५ वर्षीय महिलेसोबत ओळख झाली. ती महिला ब्युटी पार्लर चालवते. तीसुद्धा घटस्फोटित असून, ती लग्न करण्यासाठी चांगल्या मुलाच्या शोधात होती. दोन महिन्यापूर्वी तिची व इमरानसोबत फेसबुकवर मैत्री झाली. इमरानने स्वत:ची ओळख ‘रॉ’ एजंट म्हणून दिली. पाकिस्तानमध्ये आपले येणे-जाणे असल्याने त्याने सीमेपलीकडे अनेक आॅपरेशन केल्याचेही तिला सांगितले. त्याच्या बोलण्याने ती प्रभावित झाली. इमरानने तिला लग्नाची मागणी घातली. महिलेनेही ती स्वीकारली. तो तिला भेटण्यासाठी १५ दिवसापूर्वी नागपुरात आला. महिलेने आपल्या कुटुंबीयांना त्याच्याबद्दल सांगितले. लग्न करणार असल्याने तो तिच्या घरीच कुटुंबीयांसोबत तो राहू लागला. त्याने महिलेच्या बहीण-भावाला नोकरी लावण्यासोबतच बहिणीचे डुबलेले दोन लाख रुपये वसूल करून देण्याचाही विश्वास दिला.इमरानने तिच्याशी लग्न करण्यासाठी नवीन घर खरेदी करण्याची इच्छा दर्शविली. त्याने काटोल रोडवरील फ्रेण्ड्स कॉलनीमध्ये एक बंगलाही पाहिला. बंगल्याच्या मालकाला बंगल्यात काही सुधारणा करण्यासही सांगितले. दीड कोटी रुपयात बंगला खरेदी करण्याची तयारी त्याने दर्शविली. यादरम्यान १५ दिवसात वेगवेगळी कारणे सांगून त्याने महिलेकडून ३० हजार रुपये घेतले. त्याच्या एकूणच व्यवहारावरून महिलेला संशय आला. तिने मंगळवारी इमरानच्या आई-वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. परंतु आई-वडिलांचा मृत्यू झाल्याचे त्याने सांगितले. घरी त्याच्याशिवाय दुसरा कुणीही नाही, असेही सांगितले. यानंतर महिलेने त्याला ‘रॉ’चे ओळखपत्र दाखविण्यास सांगितले. यावर तो कुठलेही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. यामुळे तिचा संशय आणखीनच वाढला. तिने फटकार लावताच इमरान दुखावला गेला. इमरान स्वत: गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गेला. त्याने ठाणेदार सतीश गुरव यांची भेट घेतली.त्यांनाही त्याने रॉ एजंट असल्याचे सांगत महिलेसोबत लग्न करण्यास मदत करण्यास सांगितले. परंतु गुरव यांनी पोलीस खासगी प्रकरणात दखल देत नसल्याचे सांगून परत पाठवले. इमरानने महिलेच्या घरी गेल्यावर पुन्हा वाद घातला. असे सांगितले जाते की, त्याने आर्थिक शाखेच्या डीसीपी श्वेता खेडकर आणि अतिरिक्त महासंचालक अर्चना त्यागी यांनाही फोन केला आणि रॉ एजंट असल्याचे सांगून लग्नासाठी मदत करण्यास सांगितले. दोन्ही अधिकाऱ्यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्याशी संपर्क केला. यानंतर पोलीसही खडबडून जागे झाले. गिट्टीखदान पोलीस इमरानला घेऊन ठाण्यात आले. महिलेनेही त्याच्या फसवणुकीची माहिती दिली. एपीआय सुदर्शन गायकवाड यांनी बुधवारी दिवसभर इमरानला विचारपूस केली. त्यावरून त्याचा रॉ शी कुठलाही संबंध नसल्याचे आढळून आले. याआधारावर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अटक केली.दुसऱ्यांना प्रभावित करण्यात तरबेजइमरानच्या बोलण्यावर कुणीही संशय घेऊ शकत नाही. तो इंग्रजीसह आठ भाषांचा जाणकार आहे. त्याच्या बोलण्याने कुणीही सहजपणे प्रभावित होऊ शकतो. यामुळेच महिला व तिचे कुटुंबीयसुद्धा प्रभावित झाले होते. त्याच्या बोलण्यामुळे सुरुवातीला पोलीसही चक्रावून गेले होते. त्याच्या सांगण्यानुसार जेव्हा मुंबईतील काही पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता इमरान पोलिसांचा पंटर असल्याचे उघडकीस आले.कोट्यवधीची देशी-विदेशी मुद्राइमरानने महिलेला त्याचे अनेक देशांसोबत संपर्क असल्याचे आमिष दाखविले होते. त्याच्याकडे कोट्यवधी रुपयाची देशी-विदेशी मुद्रा असल्याचेही सांगितले होते. काही दिवसानंतर त्याला विदेशातून आणखी पैसे येणार असल्याचेही सांगितले होते. इमरानचे नातेवाईक पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये राहतात. याची माहिती होताच सुरुवातीला पोलीसही हादरले होते. त्यामुळे इमरानची अधिक माहिती काढण्यास ते गंभीर झाले. काही वेळातच इमरानचे पितळ उघडे पडले.आठवडाभरातील दुसरे प्रकरणलग्नासाठी फसवणूक केल्याचे हे आठवडाभरातील दुसरे प्रकरण आहे. ४ जून रोजी प्रतापनगर येथील एका तरुणीला सैन्यदलातील एका बोगस मेजरने ५० हजार रुपयाचा चुना लावला होता. त्याची ओळखही तरुणीसोबत शादी डॉट कॉमवर झाली होती. दोन लाख रुपये मागितल्यावर तरुणीला संशय आला. यानंतर तिने बोगस मेजरशी संपर्क तोडला होता. पोलिसांना अजूनही त्या बोगस मेजरचा पत्ता लागलेला नाही.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक