निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणे, हे विज्ञान शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. एकदा का त्यांच्यात ही दृष्टी निर्माण झाली की मग समाजोपयोगी अनेक संशोधन त्यांच्या प्रतिभेतून जन्माला येतात; कारण मानवी जीवन सुकर करणे हेच विज्ञानाचेही ध्येय आहे. ते कसे उपयोगी पडते याचे उदाहरण नागपूरच्या खुशाल देवगडे या नववीच्या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे. शेताला पाणी देण्यासाठी विजेवर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशालने इलेक्ट्रीसिटीऐवजी सायकलमध्ये हवा भरणाºया पंपच्या प्रेशरने शेतामध्ये ठिबक सिंचनाचे तंत्र विकसित केले आहे. त्याचे हे मॉडेल राज्यस्तरापर्यंत धडकले असून, केंद्राच्या योजनेतून त्याला शिष्यवृत्तीही प्राप्त झाली आहे.खुशाल हा राजेंद्र हायस्कूल, महाल येथील नववीचा विद्यार्थी. वडील महेंद्र देवगडे हे मेकॅनिक म्हणून काम करतात. त्यांच्याकडूनच नवप्रवर्तनाची प्रेरणा खुशालला मिळाली असावी. शाळेत तसा अॅव्हरेज विद्यार्थी असलेला खुशाल टाकाऊ वस्तूंपासून काहीतरी जोडतोड करून नवीन घडविण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याच कल्पनेतून ‘हवेच्या दाबाद्वारे तुषार आणि ठिबक सिंचन’ हा प्रयोग साकार झाला. रोहित ठोंबरे आणि सचला भांगे या शिक्षकांच्या मार्गदर्शनात त्याच्या या कल्पनेला आकार मिळाला.असे होईल ठिबक सिंचनया प्रयोगात हवापंप, निरुपयोगी प्लास्टिक प्लम्बिंग पाईप, रबर पाईप, पेंटच्या रिकाम्या बादल्या, सायकलचे चाक, रबर वॉशर, कॉटन रस्सी आदींचा उपयोग केला आहे. बादलीने विहिरीचे पाणी काढतो तसे वॉटर पुलीने प्रेशर देउन विहिरीचे पाणी वर आणले जाईल. या तंत्राने निव्वळ प्रेशरने विहिरीचे पाणी ३० ते ४० फूट वर ओढले जाऊ शकत असल्याचे खुशालने सांगितले. वर आलेले पाणी एका एअर टाईट टॅँकमध्ये जमा होईल. टॅँकला ठिबक सिंचनाची व्यवस्था असलेले लहान पाईप जोडायचे. यानंतर हवापंपद्वारे हवा भरून टॅँकमध्ये एअर प्रेशर निर्माण केल्यानंतर पाणी ठिबक सिंचनाने शेतात पोहचेल. या तंत्राने तुषार सिंचनाची सोय करून उद्यानाला ओलावा दिला जाऊ शकतो. या तंत्राने इलेक्ट्रीसिटीची गरज पडणार नाही आणि शेतकºयांना रात्री-बेरात्री पाणी देण्यासाठी जावे लागणार नाही.इतरही उल्लेखनीय प्रयोगखुशालने याच हवापंपाच्या प्रेशरद्वारे रॉकेट लॉन्चर तयार केले होते. याद्वारे शेतात कीटकनाशकांची फवारणी केली जाऊ शकते, असा दावा त्याने केला होता. याशिवाय पावसाने बाहेर साठविलेले धान्य खराब होऊ नये म्हणून सेन्सर पॉलिथीन कव्हर त्याने तयार केले.
संशोधनाचा ध्यास घेतलेला बालवैज्ञानिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:40 AM
मानवी जीवन सुकर करणे हेच विज्ञानाचेही ध्येय आहे. ते कसे उपयोगी पडते याचे उदाहरण नागपूरच्या खुशाल देवगडे या नववीच्या विद्यार्थ्याने दाखवून दिले आहे.
ठळक मुद्देसायकल पंपने शेतात ठिबक सिंचनाची व्यवस्थाराज्यस्तरावर धडक, केंद्राची शिष्यवृत्ती