लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : घरात कुणाला न सांगता दहा रुपये घेऊन समोसा विकत घेऊन येणे एका शाळकरी मुलांसाठी जीवघेणे ठरले. मोठ्या भावाने त्याची आईजवळ चुगली केली. एवढेच नव्हे तर समोसाही खाऊन घेतला. त्यामुळे लहान मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. समाजमन सुन्न करणारी ही घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री घडली. काटोल मार्गावर गंगानगर असून येथे नत्थुजी जमुनाप्रसाद साहू (वय ३६) आपल्या परिवारासह राहतात. पत्नी आणि दोन मुले असलेले साहू भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांचा अकरा वर्षीय मुलगा वीरू याला रविवारी रात्री समोसा खायची इच्छा झाली. त्याने घरात ठेवलेले १० रुपये चुपचाप उचलले आणि बाहेरून समोसा विकत आणला. रात्री ८.३०च्या सुमारास वीरू घरात आला. यावेळी त्याच्यापेक्षा तीन वर्षे मोठा असलेला भाऊ घरात बसून होता तर आई शेजारीसोबत समोर गप्पा करीत होती.समोसा विकत आणण्यासाठी पैसे कुठून घेतले, अशी मोठ्या भावाने विरुला विचारणा केली. विरुची चोरी पकडल्यानंतर मोठ्याने आईजवळ चुगलीही केली. आईने विरुला रागावले. तिकडे मोठ्या भावाने विरुने आणलेला समोसाही खाऊन टाकला. त्यामुळे लहानगा वीरू क्षुब्ध झाला. रागाच्या भरात तो किचनमध्ये गेला. दार आतून लोटून घेत किचनमध्ये स्टूल ठेवून आईच्या साडीने त्याने गळफास लावून घेतला. स्टूल खाली पडल्याचा आवाज आला. वीरूच्या मोठ्या भावाने आईला आवाज दिला. आत मध्ये वीरूने गळफास लावून घेतला होता. ते पाहून आईने आणि भावाने आरडाओरड केली. आजूबाजूची मंडळी धावून आली. विरुला खाली उतरवून डॉक्टरकडे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी विरुला मृत घोषित केले.परिसरात तीव्र शोककळाया घटनेमुळे परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.अवघ्या बारा वर्षाच्या मुलाने क्षुल्लक कारणावरून आत्महत्या केल्याच्या घटनेने पालकांना हादरवून सोडले आहे.
त्याने फक्त न विचारता समोसा खाल्ला.. आणि घडली ती भयावह घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 3:08 PM
मोठ्या भावाने विरुने आणलेला समोसाही खाऊन टाकला. त्यामुळे लहानगा वीरू क्षुब्ध झाला. रागाच्या भरात तो किचनमध्ये गेला. दार आतून लोटून घेत किचनमध्ये स्टूल ठेवून आईच्या साडीने त्याने गळफास लावून घेतला.
ठळक मुद्देसमाजमन सुन्न