शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
3
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
4
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
5
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
6
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
7
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
8
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
9
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
10
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
11
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
12
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
13
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
14
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
15
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
16
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
17
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
18
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
19
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
20
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक

मेट्रोच्या बांधकामाची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 1:25 AM

नागपूरकरांना मेट्रो रेल्वेची सुविधा मिळेल तेव्हा मिळेल, पण आता मेट्रो रेल्वेचे बांधकाम त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. यासंदर्भात लोकमतच्या पाहणीत अनेक खुलासे झाले आहेत.

ठळक मुद्देअपघात, वाहतुकीची कोंडी, घाण आणि मजुरांच्या सुरक्षेकडे कानाडोळा : अधिकारी सुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरकरांना मेट्रो रेल्वेची सुविधा मिळेल तेव्हा मिळेल, पण आता मेट्रो रेल्वेचे बांधकाम त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. यासंदर्भात लोकमतच्या पाहणीत अनेक खुलासे झाले आहेत. जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे नागरिकांना अनेक समस्या आणि अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पण आता लोकांचा संयम सुटला आहे.मेट्रोच्या बांधकामामुळे दरदिवशी होणारी वाहतुकीची कोंडी, लहान-मोठे होणारे अपघात, बांधकामस्थळी घाण आणि मजुरांच्या सुरक्षेकडे कानाडोळा केल्यानंतरही महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनचे अधिकारी बांधकामासंदर्भात सकारात्मक पावले उचलण्यात अकार्यक्षम दिसत आहेत. मेट्रोच्या बांधकामस्थळी ‘आज का दु:ख, कल का सुख’ असे स्लोगन लावून महामेट्रो आपल्या जबाबदारीकडे सपशेल कानाडोळा करीत आहे.लोकमतच्या पाहणीत असेही दिसून आले की, विशेषत: सीताबर्डी येथील मुंजे चौक परिसरात सुरू असलेल्या मेट्रोच्या बांधकामामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. चौकातून आनंद टॉकीजच्या दिशेने आणि आनंद टॉकीजकडून मुंजे चौकाच्या दिशेने येण्यासाठी वाहनचालकांसाठी अत्यंत अरुंद जागा सोडली आहे. एकाच वेळी एक वाहन मोठ्या प्रयत्नाने येऊ शकते. जर वाहनचालक या अरुंद मार्गाने येण्यास उत्सुक नसेल तर त्याला लांबचा पल्ला गाठावा लागतो. त्यासाठी पेट्रोल जास्त लागते. याचप्रकारच्या वाहतूक समस्येचा अनुभव मेट्रोच्या अन्य बांधकामस्थळी येतो.मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या अपघात होत असल्याची बाब लोकमतच्या पाहणीत पुढे आली आहे. दोन अपघातात एका मुलासह दोन जणांचा जीव गेला आहे, तर अन्य घटनेत मजूर आणि सामान्य नागरिक बचावले आहेत.मेट्रोच्या बांधकामस्थळी घाणीचे साम्राज्य दिसून येते. संत्रा मार्केट परिसरात पिलर्सच्या सभोवताल पावसाचे पाणी अनेक दिवसांपासून जमा आहे. पाण्यावर हिरवळ साचली आहे. येथे घाणसुद्धा फेकण्यात येते. त्यामुळे या परिसरात डास आणि माशांचा प्रकोप वाढला आहे. लगतच खोवा, पान आणि फळ बाजार आहे. डासांमुळे स्थानिक व्यापारी आणि अन्य लोकांना डेंग्यू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सोबतच खोवा, पान आणि फळांवर डास व माशा बसत असल्यामुळे आजार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.मजुरांच्या सुरक्षेकडे कानाडोळामेट्रोच्या बांधकामस्थळी कार्यरत मजुरांच्या सुरक्षेकडे महामेट्रोचे अधिकारी कानाडोळा करीत असल्याचे लोकमतच्या पाहणीत दिसून आले. मजुरांनी सुरक्षा बेल्ट, हेल्मेट घातले वा नाही, याकडे कंत्राटदार कंपनीचे निरीक्षक कानाडोळा करीत आहेत. शहराच्या चारही बाजूला सुरू असलेल्या अनेक बांधकामस्थळी सुरक्षा उपकरणांविना काही मजूर उंचीवर काम करताना दिसून आले.अपघातांवर एक नजरआॅगस्ट २०१६ : वर्धा रोडवर अजनी चौकात मेट्रो रेल्वेच्या बांधकामस्थळी तैनात असलेल्या ट्रॅफिक वार्डन मारुती ठाकरे यांना चारचाकीने धडक दिली. या अपघातात मेट्रोशी जुळलेल्या कर्मचाºयाचा मृत्यू झाला.आॅगस्ट २०१७ : हिंगणा रोडवर मेट्रोच्या साईटच्या बाजूला रस्त्यावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार वनिता मसराम यांचा मुलगा रितेशचा रस्त्यावर पडून बसखाली येऊन मृत्यू झाला होता. या प्रकरणात मेट्रोची चूक नसल्याचे सांगण्यात आले. तरीही अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अशा अपघाताची शक्यता नेहमीच असते.आॅगस्ट २०१७ : रामझुल्याजवळील संत्रा मार्केट परिसरात सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या बांधकामादरम्यान मोबाईल क्रेनचे टॉवर अचानक कोसळले होते. घटनेवेळी मजूर के्रेनजवळ नव्हते, त्यामुळे जीवहानी टळली.आॅगस्ट २०१७ : वर्धा रोडवर साईमंदिरजवळ बॅरिकेडस् हटविल्यानंतर तयार झालेल्या खड्ड्यात काँक्रिट मिक्सर गाडी फसली होती. मजुरांनी गाडीतून काँक्रिट काढले, तेव्हा गाडी बाहेर निघाली. या घटनेत नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीचा बेजबाबदारपणा असल्याचे सांगितले जाते.आॅगस्ट २०१७ : हिंगण्याजवळ मेट्रो पिलर उभारण्यासाठी बांधण्यात येणारे स्टील रॉड हवेमुळे रस्त्यावर आणि मेट्रो साईटमध्ये लागलेल्या बॅरिकेडस्वर पडले. या घटनेच्यावेळी कुणाही नसल्यामळे जीवहानी टळली. या घटनेमुळे या मार्गावरून जाणाºया वाहनचालकांना त्रास सहन करावा लागला.