शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
2
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
3
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
4
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
6
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
7
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
8
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
9
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
10
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
11
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
12
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
13
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
14
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
15
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
16
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
17
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
18
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
19
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
20
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात

डोकं दुखतंय, घरच्या घरी मिळवा डॉक्टरांचा मोफत ऑनलाईन सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2021 5:05 PM

‘ई-संजीवनी ओपीडी’मध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर व राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यात सहभागी करून घेण्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. हे डॉक्टर आपली नि:शुल्क सेवा देतील.

ठळक मुद्देराष्ट्रीय टेलिकन्सलटेशन सेवा‘ई-संजीवनी ओपीडी’मधून रुग्णांवर उपचार

नागपूर : भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जनतेच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय टेलिकन्सलटेशन सेवेद्वारे ऑनलाईन ओपीडी सेवा सुरू केली आहे. यामुळे रुग्णांना त्यांच्या आजारावर पाहिजे असलेला सल्ला किंवा उपचाराबद्दलची माहिती रुग्णालयात न जाता घरातल्या घरात मिळत आहे. डोकं दुखत असले, तरी त्यावर सल्ला दिला जात आहे. विशेष म्हणजे, लवकरच ‘एम्स’ व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलच्या डॉक्टरांचा यात सहभाग होणार आहे. यामुळे गंभीर आजाराच्या रुग्णांनाही मदत होणार आहे.

- या वेबसाईट किंवा मोबाईल ॲपवर करा नोंदणी

‘https://esanjeevaniopd.in/’ या पाेर्टलवर किंवा ‘संजीवनीओपीडी डॉट इन’ हा ॲप मोबाईलवरही विकसित करण्यात आला आहे. या वेबसाईट किंवा ‘ॲप’चा उपयोग करून रुग्णांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर टोकन जनरेट करावे लागेल. नंतर नोटिफिकेशन मिळाल्यानंतर लॉगईन करावे. तुमचा नंबर येईपर्यंत वाट पाहावे. नंतर ‘कॉल नाऊ’ हे बटन ॲक्टिव्ह होते. त्यावर व्हिडीओ कॉल करून डॉक्टरांशी सल्लामसलत करता येते.

-प्रिसक्रिप्शनही मिळणार

ऑनलाईन उपलब्ध असलेल्या डॉक्टरांशी ऑडिओ किंवा व्हिडिओद्वारे सल्लामसलत करून रुग्ण त्याच्या आजारावर विनामूल्य सल्ला घेऊ शकतात. रुग्णाच्या वेगवेगळ्या आजारांवर या सेवेद्वारे सल्ला दिला जातो. तसेच ई-प्रिसक्रिप्शनसुद्धा दिली जाते. ते डाऊनलोड करून जवळच्या औषधी दुकानातून औषधी विकत घेता येतात.

- सकाळी ९.३० पासून सुरू होते ऑनलाईन ओपीडी

‘ई-संजीवनी ओपीडी’ रविवारीसुद्धा सुरू ठेवण्यात आली आहे. सोमवार ते रविवार याची वेळ सकाळी ९.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत, तर दुपारी १.४५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतची आहे.

- जिल्ह्यात १९०३ रुग्णांनी घेतला लाभ

आतापर्यंत नागपूर जिल्ह्यामध्ये १९०३ रुग्णांनी ‘ई-संजीवनी ओपीडी’चा लाभ प्रत्यक्ष कॉलद्वारे घेतला आहे; तर, १४६२ रुग्णांनी विविध सुपर स्पेशालिटी आरोग्य सेवांचा लाभ घेतला आहे.

‘ई-संजीवनी ओपीडी’मध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) नागपूर व राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलमधील डॉक्टरांना यात सहभागी करून घेण्याला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. हे डॉक्टर आपली नि:शुल्क सेवा देतील. यामुळे गंभीर आजारांवरही रुग्णांना उपचार मिळेल.

-डॉ. दीपक सेलोकार, जिल्हा आरोग्य अधिकारी, नागपूर जिल्हा

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर