लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : काेणत्याही शाळा व तेथील शिक्षणाचा दर्जा हा त्या शाळेच्या मुख्याध्यापकावर अवलंबून असताे. मुख्याध्यापकाशिवाय शाळेचे काेणतेही काम सुरळीत चालू शकत नाही. त्यामुळे मुख्याध्यापक हा खऱ्या अर्थाने शाळेचा कणा असताे, असे प्रतिपादन ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष कुसुम किंमतकर यांनी करवाही येथील ज्ञानदीप विद्यामंदिर येथे आयाेजित कार्यक्रमात केले. यावेळी मुख्याध्यापक मनाेहर वंजारी यांचा सपत्नीक गाैरव करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आ. आशिष जयस्वाल, तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष युवराज शंकरपुरे, ज्ञानदीप शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शैलेंद्र किंमतकर, सदस्य ऋषिकेश किंमतकर, सदस्य विद्या किंमतकर, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अनिल गुप्ता, उपाध्यक्ष त्रिलोक मेहर, सरपंच सीमा कोकोडे उपस्थित होते. संस्थेच्या वतीने शाळेतील प्रत्येक कर्मचाऱ्याचा गाैरव करण्यात आला.
कार्यक्रमाला सुधाकर हुकरे, पुष्पा निघोट, मंगला गोरडे, मनीषा मलघाटे, प्रमिला साईलवार, राजेश लाडे, अल्का मेश्राम, करुणा तडस, मालती नरड, अशोक जयस्वाल यांच्यासह नागरिक उपस्थित हाेते. प्रास्ताविक केशव गोरडे यांनी केले. संचालन सिद्धार्थ ओंकार यांनी केले तर अमित तडस यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी लुकेश चरडे, प्रकाश मेश्राम, अशोक रघुवंशी, कैलास निघोट, सुभाष गायकवाड, भोले साईलवार, रमला सिरसाम यांनी सहकार्य केले.