लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत असतानाच, जिल्हा परिषदेचे मुख्यालयही कोरोनाच्या सावटात आले आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सहा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्याचबरोबर पं.स. हिंगणा, रामटेक, काटोल व रामटेक मध्येही कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले आहेत. जि.प.च्या मुख्यालयी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.गुरुवारी आरोग्य विभागातील एक तर सामान्य प्रशासन विभागातील एक असे दोन कर्मचारी कोरोनाग्रस्त असल्याचे समोर आले. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्या कोरोना चाचण्याही करण्यात आलेल्या आहेत. जिल्हा परिषदेत गेल्या दहा दिवसात १० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात आरोग्य विभागातील २, शिक्षण विभागातील २, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील १ व सामान्य प्रशासन विभागातील १ कर्मचारी पॉझिटिव्ह आला आहे. नागपूर पंचायत समितीमध्ये बैठकीसाठी आलेला एक लोकप्रतिनिधी पॉझिटिव्ह निघाला होता.कर्मचाऱ्यांमध्ये दहशतशासकीय कर्मचाऱ्यांबाबत १५ टक्के उपस्थितीबाबत स्पष्ट निर्देश आहे. पण कर्मचारी १०० टक्के कामावर येत आहे. दुसरीकडे संक्रमित कर्मचाºयांची संख्या वाढत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. कर्मचारी आपापल्या वरिष्ठांकडे तक्रार करू लागले आहेत.
कोरोनाच्या सावटात नागपूर जि.प.चे मुख्यालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2020 1:11 AM
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण वाढत असतानाच, जिल्हा परिषदेचे मुख्यालयही कोरोनाच्या सावटात आले आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील सहा कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले आहेत.
ठळक मुद्देसहा जण निघाले पॉझिटिव्ह : उपस्थितीवरून कर्मचाऱ्यांची नाराजी