उमरेड : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा आघाडी, एकराजे ग्रुप, राजाधिराज प्रतिष्ठान, डॉ. दळवी स्मारक रुग्णालय व अनुसंधान केंद्र नागपूर यांच्या संयुक्त वतीने आयोजित आरोग्य व नेत्रतपासणी शिबिरात ३०० जणांची तपासणी करण्यात आली. मंगळवारी प्राथमिक शाळेत हे शिबिर नुकतेच पार पडले. यावेळी आमदार राजू पारवे, माजी आमदार सुधीर पारवे, नगराध्यक्ष विजयलक्ष्मी भदोरिया, उपाध्यक्ष गंगाधर फलके, नगरसेवक महेश भुयारकर, विकास देशमुख, हरीहर लांडे, अरुणज्ञ हजारे, माया मेश्राम, लेमन बालपांडे, दिलीप सोनटक्के, जगदीश वैद्य, सुरेश वाघमारे, रमाकांत बावणे, अमित लाडेकर, सुबोध धनविजय, संजय घुग्घुसकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. गुणवंत मांढरे, गोलु जैस्वानी, केतन रेवतकर, राकेश नौकरकर, श्रावण गवळी, रितेश राऊत, पप्पू बनकर, रोशन झाडे, लकी फटींग, आकाश लेंडे, मयूर लेंडे आदींनी सहकार्य केले.
३०० जणांची आरोग्य व नेत्रतपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 4:11 AM