नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठ येथे राज्यभर गाजलेल्या कुश कटारिया हत्याकांडावर बुधवारपासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली. आरोपीचे वकील ए. एम. रिझवी यांनी कुशचे वडील प्रशांत, आई छाया, मित्र शुभम बैद व रिदम पुरिया यांचे बयान वाचून त्रुटी नोंदविल्या. उद्या, गुरुवारी दुपारी २.३० वाजतापासून पुढील सुनावणी होणार आहे. आयुष निर्मल पुगलिया (वय २४) असे मुख्य आरोपीचे नाव आहे. सत्र न्यायालयाने आयुषला अपहरण, हत्या व पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. परंतु, भादंविच्या कलम ३६४-अ (खंडणीसाठी अपहरण) मधून त्याला दोषमुक्त करण्यात आले आहे. आयुषने त्याच्या शिक्षेला उच्च न्यायालयात अपील करून आव्हान दिले आहे. याशिवाय शासनाच्या दोन अपील आहेत. एक अपील आयुषला फाशीची शिक्षा देण्यासाठी, तर दुसरे अपील भादंविच्या कलम ३६४ (अ)मधून सुटकेला आव्हान देणारे आहे. शासनातर्फे विशेष सरकारी वकील राजेंद्र डागा यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
कुश हत्याकांडावर सुनावणी सुरू
By admin | Published: February 26, 2015 2:20 AM