सुमेध वाघमारेनागपूर :
हृदयाकडे येणारे रक्त शुद्धीकरणासाठी फुप्फुसाकडे पाठविण्याऐवजी प्रणालीगत रक्ताभिसरणात विचलित व्हायचे. यामुळे अवघ्या दोन दिवसाच्या नवजात शिशूला श्वास घेणे कठीण झाले होते. त्याचे संपूर्ण शरीर निळसर पडले होते. बाळाची गंभीर प्रकृती पाहता डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. हृदयाची रक्तवाहिनी फुप्फुसाला जोडण्याची शस्त्रक्रिया केली. १७ दिवस बाळावर विशेष उपचार करत बाळाचे प्राण वाचविले.
नागपुरातील एका महिलेने २३ मार्च रोजी एका गोंडस बाळाला जन्म दिला. बाळाचे वजन सव्वादोन किलो होते. परंतु, बाळाला जन्मत: हृदयविकार होता. २४ मार्च रोजी नातेवाईक बाळाला घेऊन ‘कार्डियन’ रुग्णालयात आले. हृदयरोग शल्य चिकित्सक डॉ. निकुंज पवार यांनी तपासून ‘कन्जनायटल सायनोटिक हार्ट डिसिज’चे निदान केले.
दीड-दोन वर्षांनंतर पुन्हा शस्त्रक्रियादीड-दोन वर्षानंतर या बाळावर पुन्हा शस्त्रक्रिया करावी लागेल. यात हृदयात असलेले छिद्र बंद केले जाईल. शिवाय, हृदयातून फुप्फुसाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमनीचा आकार मोठा केला जाईल. - डॉ. निकुंज पवार, हृदय शल्य चिकित्सकफुप्फुसे बंद पडण्याचा धोका होताबाळावरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली असली तरी पुढील काही दिवस महत्त्वाचे होते. यात त्याच्या ‘न्युट्रिशियन्स’ची समस्या होती. बाळ थंड पडण्याची भीती होती व फुप्फुस बंद पडण्याचा धोका होता. परंतु, सलग १७ दिवसांच्या उपचारानंतर बाळ धोक्याबाहेर आले.
डॉ. पवार यांनी ‘सांगितले की, हृदय रक्त फुप्फुसांपर्यंत पोहोचवते. हृदय, फुप्फुस किंवा रक्तामध्ये काहीही समस्या निर्माण झाल्यास रक्तामध्ये ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते, यामुळे त्वचेचा रंग निळा पडू लागतो.