शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
2
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
3
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
4
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल
5
बापरे! दिवाळीची साफसफाई करताना चुकून कचऱ्यात फेकलं ४.५ लाखांचं सोनं; झालं असं काही....
6
महाराष्ट्रात कुणाची हवा? समोर आलेला हा नवा सर्व्हे भाजपची झोप उडवणारा अन् CM शिंदेंचंही टेन्शन वाढवणारा!
7
IPL 2025 : रोहित की हार्दिक! मुंबई इंडियन्सचा कॅप्टन कोण असणार? फ्रँचायझीची मोठी घोषणा
8
वन नेशन वन इलेक्शन आणि UCC कधीपासून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,...
9
MI नं बुमराहसाठी मोजली मोठी रक्कम; रोहित-हार्दिकसह सूर्याला किती कोटींमध्ये केलं रिटेन?
10
"दीपोत्सवाचं निमंत्रण नाही", अयोध्येच्या खासदाराचा गंभीर आरोप; भाजपाचा पलटवार, म्हणाले...
11
"पवार साहेब, ही तुमची गद्दारी आहे"; सदाभाऊ खोतांनी शरद पवारांवर चढवला हल्ला
12
Ajit Pawar: आर. आर. पाटलांवर गंभीर आरोप; वाद चिघळल्यानंतर अजित पवार म्हणाले...
13
भाजपने आठ विधानसभा मतदारसंघात बदलले उमेदवार; 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता कट
14
"राज ठाकरे कधी रिव्हर्स गिअर घेतील आणि कधी…’’, त्या विधानावर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया   
15
सारा अली खानचंं सीक्रेट अफेअर! भाजपा नेत्याच्या मुलाला करतेय डेट? केदारनाथला झाले स्पॉट
16
"दाऊदशी संबंध जोडणाऱ्यांना नोटिस बजावणार’’, भाजपा नेत्यांना नवाब मलिकांचा इशारा 
17
प्रियकरासोबत सापडली पत्नी! पती CRPF जवानाचा पारा चढला; रेल्वे स्टेशनवर एकच राडा...
18
IPL 2025मध्येही 'फोडाफोडी'चं राजकारण! पंतला CSKमध्ये आणायला धोनी लावतोय 'फिल्डिंग'?
19
अमित ठाकरेंना घेरण्याची 'उद्धव'निती; थेट मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना लिहिलं पत्र
20
कवठेमहांकाळात खेला होबे! रोहित पाटलांच्या विरोधात तीन रोहित पाटील; एकाच नावाचे ४ उमेदवार

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जंगी स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2022 10:17 AM

नागपूर विमानतळावर देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. 

ठळक मुद्देभाजपचे शक्तिप्रदर्शन, रस्ते बंद असल्याने नागरिकांची अडचण

नागपूर : नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आज नागपुरात आगमन झाले. नागपूर विमानतळावर फडणवीस यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते उपस्थित असून ढोल ताशांच्या गजरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. 

'कोण आला रे कोण आला.. महाराष्ट्राचा वाघ आला', देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. फडणवीस यांनीही हात उंचावून आपल्या कार्यकर्त्यांचे प्रेमपूर्वक स्वागत स्वीकारले. तसेच, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून नमन केले. याप्रसंगी उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. यावेळी जोरदार घोषणाबाजीसह भाजप कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं.

शहरातील विविध भागात देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 'प्रथम राष्ट्र नंतर पक्ष' अशा आशयाचे होर्डिंग त्यांच्या स्वागतासाठी शहरभर लावण्यात आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून रॅली ते धरमपेठेतील येथील फडणवीस यांच्या निवासस्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली असून पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे.

दरम्यान, राज्यात सत्ताबदलानंतर फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, हा भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वास होता. प्रत्यक्षात राजकीय खेळींमुळे कार्यकर्त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरले व फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. यानंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या छायाचित्राविना विविध ठिकाणी फडणवीस यांच्या समर्थनार्थ ‘होर्डिंग्ज’देखील लागले व ‘सोशल मीडिया’वरदेखील फडणवीसांचा राजकीय ‘गेम’ झाल्याची भावना कार्यकर्ते व्यक्त करत होते. फडणवीस यांना उपमुख्यमंत्रिपद मिळाल्यामुळे नाराज झालेल्या भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मरगळ दूर करून उत्साहात त्यांचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला. यासह सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने विमानतळावर उपस्थित राहण्याचे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांनी केले होते.

टॅग्स :PoliticsराजकारणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा