नागपूर : मागील पंधरा दिवसांपासून आग ओकत असलेला सूर्य पुन्हा पुढील तीन दिवस तरी उसंत घेणार नाही. तापमान कायम राहणार असून, चंद्रपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांसह अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने १० मेपर्यंत यलो अलर्ट जाहीर केला आहे.
दरम्यान, शुक्रवारीही चंद्रपूरचे तापमान विदर्भासह राज्यात सर्वाधिक म्हणजे ४५.२ नोंदविले गेले. अमरावतीमध्ये ४३.८ आणि नागपूर व अकोलामध्ये ४३.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कालच्यापेक्षा उष्णतामान वाढल्याची नोंद असून, नागपुरात ०.५ अंश सेल्सिअसने तर चंद्रपुरात १.५ अंश सेल्सिअसने तापमान वाढले आहे. यामुळे उन्हाचा कडाका कमी झाला नसल्याने होरपळ कायमच आहे.