शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

नवतपाचा कहर, नागपूर @ ४६.५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 10:01 AM

दोन दिवसांपासून सुरू झालेला नवतपा नागपुरात चांगलाच कहर बरसायला लागला आहे. शनिवारी नागपूरचे तापमान ४६.५ अंश सेल्सिअस होते. या वर्षातील हा उच्चांकी तापमानाचा दिवस ठरला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन दिवसांपासून सुरू झालेला नवतपा नागपुरात चांगलाच कहर बरसायला लागला आहे. शनिवारी नागपूरचे तापमान ४६.५ अंश सेल्सिअस होते. या वर्षातील हा उच्चांकी तापमानाचा दिवस ठरला आहे. त्यापाठोपाठ अकोल्यातही ४६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा व अमरावती हे जिल्हेही चांगलेच तापत आहेत.दोन दिवसापासून नवतपा सुरू झाला आहे. या काळामध्ये उष्णतामान प्रचंड वाढते. त्याचा अनुभव अगदी दुसऱ्याच दिवशी आला आहे. नागपुरातील तापमान गेल्या २४ तासात ०.९ अंश सेल्सिअसने वाढले. आज या तापमानाची नोंद ४६.५ करण्यात आली. तर अकोला शहरातदेखील ०.८ अंशाने तापमान वाढले. तेथे ४६ अंश तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या तीन दिवसापासून नागपूर शहराच्या तापमानात प्रचंड वाढ होत आहे. याचा परिणाम शहराच्या जनजीवनावर पडला आहे. लॉकडाऊनच्या काळात रस्ते थोडेफार सुरू राहत असले, तरी गेल्या तीन दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे दुपारी रस्ते सुनसान होत आहेत. नागरिक आपली महत्त्वाची कामे सकाळच्या प्रहरात उरकताहेत किंवा सायंकाळी चारनंतर घराबाहेर पडण्याला प्राध्यान्य देत आहेत. पुढील आठवड्यातदेखील वातावरण चांगले तापणार असल्याचा इशारा वेधशाळेने वर्तविला आहे. विदर्भात नागपूर व अकोल्यासोबतच अमरावती, चंद्रपूर या दोन्ही ठिकाणी ४५.६ अंश तापमानाची नोंद झाली, तर वर्धा ४५.५ आणि गोंदियामध्ये ४५.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले आहे .विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी आणि वाशिम या ठिकाणी कमी तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरीमध्ये १.४ अंशाने तापमान वाढले असले तरी ४१.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, तर वाशिम शहरांमध्ये ०.४ अंशाने तापमानात घट झाली असून ४२.६ अशी नोंद तिथे झाली आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात