शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

नागपूर विभागातील २१ तालुक्यांत अतिवृष्टी : हजारो कुटुंब बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 9:47 PM

विभागात मागील २४ तासांत नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील २१ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, सर्वाधिक पावसाची नोंद नागपूर शहर व ग्रामीणमध्ये २८२ मि. मी. झाली आहे. विभागात सरासरी ६०.४ टक्के मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसात नागपुरातील गामीण भागाला सर्वाधिक फटका बसला. हजारो कुटुंब पाण्यात अडकली. जिल्हा प्रशासन, राज्य आपत्ती बचाव पथक (एसडीआरएफ) आणि अग्निशमन विभागाने संयुक्तपणे मदतकार्य राबवून पाण्यात अडकलेल्या हजारो लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले. आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

ठळक मुद्देजनजीवन पूर्वपदावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विभागात मागील २४ तासांत नागपूर, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील २१ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली असून, सर्वाधिक पावसाची नोंद नागपूर शहर व ग्रामीणमध्ये २८२ मि. मी. झाली आहे. विभागात सरासरी ६०.४ टक्के मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसात नागपुरातील गामीण भागाला सर्वाधिक फटका बसला. हजारो कुटुंब पाण्यात अडकली. जिल्हा प्रशासन, राज्य आपत्ती बचाव पथक (एसडीआरएफ) आणि अग्निशमन विभागाने संयुक्तपणे मदतकार्य राबवून पाण्यात अडकलेल्या हजारो लोकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यात आले. आता जनजीवन पूर्वपदावर आले आहे.विभागात मागील २४ तासात जिल्हानिहाय झालेल्या पावसामध्ये नागपूर जिल्ह्यात सरासरी १३२.६१, वर्धा ६१.०५, भंडारा ३३.३७, चंद्रपूर ९२.२७, गोंदिया १९.२७ तर गडचिरोली जिल्ह्यात २१.५४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक नागपूर जिल्ह्यात १० तालुक्यात ६५ मि.मी पेक्षा जास्त पाऊस झाला असून, यामध्ये हिंगणा तालुक्यात २७२.७०, सावनेर ११६.४०, रामटेक १७०.४०, पारशिवनी १९३, मौदा ९०, उमरेड १३१.४०, कुही १००.६०, कामठी ८४.८०, कळमेश्वर ६२ तर काटोल १८.२०, नरखेड ३२, भिवापूर १९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील तीन तर चंद्रपूर जिल्ह्यातील सात तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.अतिवृष्टीमुळे हिंगणा तालुक्यातील १५ गावांतील ३ हजार ४५० कुटुंब बाधित झाले असून, ९४५ बाधित घरांचा समावेश आहे. काल पडलेल्या अतिवृष्टीमुळे ४८० कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते. यामध्ये तुरकमारी, वडगाव, विरुळ, इरमिती, रायपूर, टाकळघाट, सुपरीबेला आदी गावांचा समावेश होता. जिल्हा प्रशासनाने या गावांमध्ये बाधित कुटुंबांना तात्काळ मदत उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली आहे.नागपूर ग्रामीणमधील पुरामुळे २० गावे बाधित झाली असून, २८४ बाधित कुटुंबे आहेत. तसेच २८४ घरे बाधित झाले असून, ३९ कुटुंबांना

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर