लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकीकडे पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थितीने दाणादाण उडवली असताना गुरुवारी विदर्भातदेखील सर्वदूर पाऊस आला. दिवसभर संततधार सुरू असल्याने काही जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषत: गोंदिया, गडचिरोली येथे पावसाचा जोर जास्त दिसून आला. गोंदिया जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला.गुरुवारी सकाळपासूनच विदर्भातील सर्वच जिल्ह्यात पाऊस पडतो आहे. नदीनाले ओसंडून वाहत होते. गडचिरोली व गोंदियातील दुर्गम भागातील गावांचा तर संपर्कदेखील तुटला. अनेक गावांना जोडणारे पूल पाण्याखाली गेले होते.नागपुरातदेखील सकाळी ८.३० पासूनच पावसाला सुरुवात झाली. दिवसभर शहरात ४१.६ मिमी पाऊस नोंदविण्यात आला. शहरातील सखल भागात पाणी साचले होते. दिवसभर संततधार असल्याने बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडीदेखील दिसून आली. पुढील २४ तासात अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, बुलडाणा येथे अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.२४ तासात झालेला पाऊस (सकाळी ८.३० वाजेपर्यंत)जिल्हा पाऊस (मिमीमध्ये)अकोला २१.६अमरावती ४२.६बुलडाणा ३५.०चंद्रपूर १५.६गडचिरोली ४०.६गोंदिया ६७.८नागपूर २.६वर्धा ८.८वाशीम १८.०यवतमाळ २१.६