नागपूर : अतिवृष्टीमुळे नागपूरची दाणादाण उडाली आहे. एसडीआरएफच्या २ तुकड्या ७ गटांत विभागण्यात आल्या असून सखल भागातील नागरिकांना बाहेर काढण्यात आले. विविध बचाव पथकांनी राबविलेल्या मोहिमे एकूण ३४९ लोकाना पुराच्या पाण्यातून सुखरूप बाहेर काढले.
अंबाझरी तलाव, नाग नदी, पिवळी नदी आणि स्थानिक नाला ओव्हरफ्लो झाल्यामुळे शहरातील अनेक भागात विशेषत: अंबाझरी तलाव, नाग नदीजवळील सखल भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली. धरमपेठ, शंकर नगर, अंबाझरी एनआयटी, झाशी राणी चौक, पंचशील चौक, कांचीपुरा, कॉटन मार्केट, लकडधंज आदी भागात पाणी शिरले आणि घरांमध्ये पाणी शिरले. एनएमसी अग्निशमन दल, एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय लष्कर आणि आपदा मित्र पथके अडकलेल्या लोकांच्या सुटकेसाठी तैनात करण्यात आली होती.
- बचाव कार्य
- मनपा अग्निशमन दल : १५२ व्यक्ती- एसडीआरएफ टीम : १०५ व्यक्ती- एनडीआरएफ टीम : ४५ व्यक्ती- भारतीय सैन्य दल : ३६ व्यक्ती- आपदा मित्र टीम : ११ व्यक्ती