शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

नागपुरात पावसाची दमदार हजेरी; उकाड्यापासून नागरिकांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 2:47 PM

जून महिन्याच्या प्रारंभी एक दोन दिवस दर्शन देऊन लुप्त झालेल्या पर्जन्यराजाने आज सकाळपासून नागपुरात आपली दमदार हजेरी लावली.

ठळक मुद्देबळीराजाला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जून महिन्याच्या प्रारंभी एक दोन दिवस दर्शन देऊन लुप्त झालेल्या पर्जन्यराजाने आज सकाळपासून नागपुरात आपली दमदार हजेरी लावली. दोन दिवसांपासून नागपूर व विदर्भात कडक उन तापत होते. उन्हाळा जणू परत आला असावा असाच भास नागरिकांना होत होता. कालपासून वातावरण थोडे ढगाळ झाल्याने लवकरच पाऊस बरसेल असा अंदाज वर्तविला जात होता. तो आज सकाळी खरा ठरवून पावसाने नागपुरात जोरदार आगमन केले.जून महिन्याचा दुसरा पंधरवडा हा अक्षरश: कोरडा गेला असून, बळीराजासोबतच सामान्य नागरिकदेखील पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करीत होते. पेरणीयोग्य पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत. जून महिन्याच्या सुरुवातीला नागपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. मात्र त्यानंतर सातत्याने वातावरण कोरडेच राहिले. विदर्भात पुढील ४८ तासात काही ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे.कृषी विभागाने घेतलेल्या आढाव्यात १२.६४ टक्के पेरण्या पार पडल्या आहेत. रामटेक व नागपूर (शहर) पेरणीलाच सुरुवात झाली नाही. जून महिना संपत आला असताना पेरण्या खोळंबल्याने शेतकरी चिंतित आहेत. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता पावसाची प्रतीक्षा करावी. पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे नागपूर जिल्ह्याच्या कृषी हवामान सल्ला पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Rainपाऊस