लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: रविवारी पहाटेपासूनच विदर्भाच्या अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील काही गावांमध्ये कडकडाटी वादळी पावसासह गारांचा वर्षाव झाला. यवतमाळ जिल्हयातल्या घाटंजी तालुक्यात असलेल्या टिटवी येथे गारा पडल्या. अकाली पावसापासून कापणीसाठी तयार असलेल्या तूर व हरभरा पिकाला झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. आंब्याच्या मोहराला या पावसाने चांगलाच फटका दिल्याचे दिसले.विदर्भात रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. अमरावतीच्या अंजगाव सुर्जी येथे पहाटेपासूनच गारा पडायला सुरुवात झाली होती. यवतमाळ जिल्ह्यात सकाळी १० च्या सुमारास पाऊस बरसू लागला. पुसद, महागाव, दारव्हा, नेर, बाभूळगाव, घाटंजी येथे पावसाच्या मोठ्या सरी कोसळल्या. नागपूरमध्येही दुपारी १२ च्या सुमारास पावसाने कडकडाटासह जोरदार शिडकावा केला. गोंदिया जिल्ह्यात ढगाळ हवामान होते. अकाली आलेल्या या पावसाने सर्वत्र गारवा पसरल्याने गेल्या दोनचार दिवसांपासून विदर्भाला उन्हाळ््याची चाहूल देणाऱ्या उष्णतेपासून नागरिकांची सुटका झाली.
नागपूरसह विदर्भाच्या अनेक जिल्ह्यात गारांसह जोरदार पर्जन्यवृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:33 PM
रविवारी पहाटेपासूनच विदर्भाच्या अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील काही गावांमध्ये कडकडाटी वादळी पावसासह गारांचा वर्षाव झाला.
ठळक मुद्देसंत्रा, कापूस, हरभरा पिकांचे मोठे नुकसान