शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

अतिपावसाने साेयाबीनची प्रत खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:10 AM

अभय लांजेवार लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : योग्यवेळी मान्सून दाखल झाल्यानंतर सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांनी चांगलीच ‘लय’ पकडली होती. पिकांची ...

अभय लांजेवार

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : योग्यवेळी मान्सून दाखल झाल्यानंतर सोयाबीन पेरणीसाठी शेतकऱ्यांनी चांगलीच ‘लय’ पकडली होती. पिकांची योग्य वाढ, योग्यवेळी उघाड आणि पाऊस यांचा समतोल साधला गेला होता. यामुळे यंदा अनेकांच्या शेतात सोयाबीनचे पीक बहरले होते. अशातच सप्टेंबर महिना उजाडला आणि अतिपावसाने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणीच फेरले. उमरेड विभागात केवळ दोन दिवस वगळता तब्बल २४ दिवस पाऊस झाला. या अतिपावसामुळे आता सोयाबीनची प्रत खालावली असून, चकाकीसुद्धा गेल्याचे दिसून येत आहे. सोबतच दाणे काळवंडले, खराब, मातीचे प्रमाण अधिक असल्याने शेतकऱ्यांना चौफेर मार बसला आहे. शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

असंख्य शेतकरी भरपावसात काही तासांची उघडीप मिळताच कशीबशी सोयाबीन पिकाची कापणी करत आहेत. शिवाय मजुरीचा दरही ३५० ते ४०० रुपये झाला असून, आधीच प्रचंड नुकसान आणि त्यात कापणीचे आकाशाला भिडलेले दर यामुळे शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे.

सध्या संपूर्ण पानगळ होत, सोयाबीन कापणीला आले आहे. अशातच पाऊस आणखी लांबला तर उरलेसुरले चार आणे पीकही मातीत जाईल, अशी बिकट परिस्थिती आहे. दुसरीकडे शेंगांमधूनच कोंब निघण्याचेही प्रकार सुरू झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत. उत्पादनात घट, दाणा सडका आणि कोंब निघाल्याने अधिक फटका अशा गंभीर परिस्थितीत सोयाबीन उत्पादक सापडला आहे. सततच्या पावसामुळे कापणी कधी करायची, असाही प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे.

.....

उगवण क्षमता?

अतिपावसामुळे सोयाबीनची प्रत खालावली असल्याने आता गुणवत्ता शाबूत असलेल्या सोयाबीनचे उत्पादन अशक्य झाले आहे. शिवाय यंदाच्या सोयाबीन पिकाची उगवण क्षमतासुद्धा कमी राहणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे पुढील हंगामाच्या पेरणीसाठी चांगलीच अडचण निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

.....

पाऊसच पाऊस

परिसरात १ सप्टेंबरपासून पावसाचा जोर कायम आहे. आतापर्यंत उमरेड तालुक्यात ८३४.८६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. केवळ १९ आणि २० सप्टेंबर हे दोन दिवस वगळता इतर दिवशी पावसाचे आगमन झाले आहे. शिवाय अजूनही वादळी पावसाच्या शक्यतेमुळे गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.

....

कचराच अधिक

सततच्या पावसामुळे अनेकांच्या शेतातील तण नियोजनाचे गणितसुद्धा बिघडले आहे. यामुळे आता अनेकांच्या शेतात सोयाबीनऐवजी कचराच अधिक प्रमाणात दिसून येत आहे. पावसामुळे ओलावा अधिक पकडून राहिल्याने कापणीसाठी शेतमजुरांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

....

कापणीनंतर मळणी करा

सोयाबीनची कापणी करताना अर्धा दिवस कापणी आणि अर्धा दिवस उचल असे नियोजन शेतकऱ्यांनी आखावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शिवाय बरेच दिवस शेतात ढीग लावून ठेवू नये. कापणीनंतर त्यावर पुन्हा पाऊस झाल्यास अशा सोयाबीनचा ढीगही लावणे अशक्य होणार आहे. कापणीनंतर मळणीदेखील काही दिवसातच करावी, असाही सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.

.....

आशेचा किरण

उमरेड विभागात सोयाबीन उत्पादकांचे हाल-बेहाल झाल्याचे चित्र आहे. ही कठीण परिस्थिती अनेकदा ‘लोकमत’ने मांडली. दरम्यान, हवालदिल शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत शासनाकडून खेचून आणणार, असा शब्द आमदार राजू पारवे यांनी दिला आहे. त्यामुळे विभागातील शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण दिसून येत आहे.