शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

मुसळधार पावसाने नागपुरात दाणादाण; बाभूळखेड्यात जीर्ण घर कोसळून एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 12:54 PM

गुरुवारी दुपारपर्यंत नागपुरात पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर रस्ते जलमय झाले. काही वेळ तर अंधारल्यागत स्थिती होती. रात्री उशिरापर्यं पाऊस सुरूच होता.

ठळक मुद्देदुपारी धाेधाे बरसला, ५२ मिमीची नाेंद : जिल्ह्यातही रिपरिप

नागपूर : पावसाची झड सातव्या दिवशीही कायम असून गुरुवारी पावसाने नागपूरकरांना पुन्हा धाेधाे धुतले. सकाळपासून शांततेत रिपरिप करणाऱ्या पावसाने दुपारी उग्र रूप धारण केले. तब्बल दाेन तास काेसळधार सुरू हाेती. पावसाच्या जाेरदार तडाख्यामुळे शहरातील रस्त्यावर पुरासारखे पाणी वाहत हाेते, तर अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची अक्षरश: दाणादाण उडाली. दरम्यान, जिल्ह्यात पारशिवनी वगळता इतर तालुक्यात थाेडी उसंत घेतली. तर, नवीन बाभूळखेड्यात जीर्ण घर कोसळून एकाचा मृत्यू झाला.

दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे नवीन बाभूळखेडा, तीन मुंडी झेंडी चौक येथील जीर्ण घर कोसळले, त्यात एकाचा मृत्यू झाला. तर एक महिला जखमी झाली. किशोर केसलवार (३९) असे मृताचे नाव आहे. तर, जखमीचे नाव त्रिशेली केसलवार (२७) आहे. प्राप्त माहितीनुसार, केसलवार कुटुंब आपल्या दोन मुलांसह मागील वर्षांपासून विद्या रंगारी यांच्या या घरात भाड्याने राहत होते. हे घर जीर्ण अवस्थेत होते. मनपाचे अधिकारी या भागात फिरकत नसल्याने त्यांच्याकडून कोणतीही नोटीस बजावण्यात आली नव्हती. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कौलारू असलेले हे घर  गुरुवारी रात्री १० च्या सुमारास अचानक कोसळले. त्यावेळी घरात किशोर व त्रिशेली हे पती-पत्नी होते. तर, दोन्ही मुले बाहेर होती, दरम्यान ही घटना घडली. यावेळी परिसरातील लोक धावून आले त्यांनी मलब्यात दबलेल्या किशोर व त्रिशेली यांना बाहेर काढले. मेडिकलमध्ये डॉक्टरांनी किशोरला तपासून मृत घोषित केले.

पावसामुळे नागपूरकरांची धावाधाव

सकाळपासून रिपरिप सुरू असताना दुपारी मात्र पाऊस जाेरात धडकला. ही काेसळधार दीड-दाेन तास सुरू हाेती. मुसळधार पावसामुळे नागपूरकरांची तारांबळ उडाली. रस्त्यावर पावसाचे पाणी ओसंडून वाहत हाेते. शंकरनगर, मेडिकल चाैक, धंताेली, पडाेळे चाैक, नरेंद्रनगर, नरेंद्रनगर पूल, त्रिमूर्तीनगर आदी भागात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले हाेते. त्यामुळे वाहनचालकांना चांगलाच मनस्ताप झाला. अनेक वस्त्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले. विविध भागांतील झाेपडपट्ट्यांमध्ये नागरिकांची दैनावस्था झाली आहे.

पारशिवनीत जाेरधार, बाकी शांत

तीन-चार दिवसात पावसाच्या तडाख्याने हवालदिल झालेल्या सावनेर तालुक्याला गुरुवारी दुपारनंतर उसंत मिळाली. पावसाची रिपरिप सुरू हाेती, पण जाेर कमी हाेता. गुरुवारी जिल्ह्यात सर्वाधिक जाेर पारशिवनी तालुक्यात हाेता. येथे सकाळपर्यंत ४७.९ मि.मी. पावसाची नाेंद झाली. दिवसभरही रिपरिप कायम हाेती. उमरेड, कुही, भिवापूर, काटाेल, नरखेड आदी तालुक्यात हलका पाऊस झाला.

टॅग्स :AccidentअपघातnagpurनागपूरRainपाऊसDeathमृत्यू