नागपूर : नागपुरातील मुसळधार पावसामुळे शंकर नगर सबस्टेशन पाण्यात असल्याने रामनगर, अंबाझरीसह या सबस्टेशनवरील हजारो ग्राहक अंधारात आहे. वीज पुरवठा खंडित उपराजधानीला शुक्रवारी रात्रीपासून पावसाने झोडपल्याने महावितरणचे शंकर नगर आणि इतरही अनेक सब स्टेशन आणि वीज यंत्रणा पाण्यात गेली आहे. तर अनेक वस्तीमध्ये पाणी शिरल्याने महावितरणला रात्री २ पासूनच शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा बंद करावा लागला. त्यामुळे हजारो ग्राहक अंधारात आहेत.
नागपुरातील मुसळधार पावसामुळे शंकर नगर सबस्टेशन पाण्यात असल्याने रामनगर, अंबाझरीसह या सबस्टेशनवरील हजारो ग्राहक अंधारात आहे. सरस्वती कॉलनी, भांगे लॉन (त्रिमूर्ती नगर), ऑरेंज सिटी टॉवर, इटर्निटी मॉल, बँक ऑफ महाराष्ट्र, संस्कृती संकुल, धनवटे, वर्मा लेआउट, अंबाझरी लेआउट, (शंकर नगर विभाग क्षेत्र), अजमेरा एफडीआर, नरेश चंद्र एफडीआर, बुर्डी, रीजेंट विभाग, लँड मार्क एफडीआर, धंतोली विभाग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे बंद ठेवले, तसेच इतरही अनेक Pफीडर बंद ठेवले जात आहे. बेसा- बेलतरोडी परिसरातील बराच भाग अंधारात आहे. सबस्टेशन, वीज वितरण पेटी, रोहित्र, लोकांच्या घरात पाणी शिरल्याने खबरदारी म्हणून येथील वीज पुरवठा खंडित केल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.
सकाळी ८.३० पर्यंत ११६. ५ मिमी पाऊस
मध्यरात्री २ वाजतापासून सुरू झालेला पाऊस पहिल्या दोन तासांमध्ये ९० मिमी बरसला. तर हवामान खात्याने केलेल्या नोंदीनुसार सकाळी ८.३० पर्यंत ११६.५ मिमी ची नोंद करण्यात आली. मुसळधार पावसामुळे गोरेवाड्याचे २ गेट उघडण्यात आले. हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे.
मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी रस्त्यावर
मुसळधार पावसामुळे शहरातील परिस्थितीचा आढावा मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी व जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी रस्त्यावर उतरून घेतला. त्यांनी मनपा मुख्यालयातील अटल बिहारी सिटी ऑपरेशन सेंटरमधूनही शहरातील पूर परिस्थिती जाणून घेतली.