लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : न्यायालयीन प्रकरणांच्या फाईल्सचे बस्ते पहिल्या माळ्यावर चढवणे व तेथून खाली उतरविणे या अवजड कामाकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विशेष लिफ्ट बसविण्यात आली आहे. त्या लिफ्टचे सोमवारी बस्ता कर्मचाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या लिफ्टमुळे बस्ता कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.न्यायालयीन प्रकरणांच्या फाईल्सचे हजारावर बस्ते रोज वकिलांच्या कारमधून खाली उतरविणे व पहिल्या माळ्यावरील संबंधित न्यायालयांमध्ये पोहोचवून देणे आणि न्यायालयाचे कामकाज संपल्यानंतर ते बस्ते परत खाली आणून वकिलांच्या कारमध्ये ठेवून देणे या कामासाठी हायकोर्ट बार असोसिएशनने कर्मचारी नियुक्त केले आहेत. सपाट ठिकाणी चाकांच्या ट्रॉलीद्वारे फाईल्सचे बस्ते इकडून-तिकडे हलविले जातात. त्याचा बस्ता कर्मचाऱ्यांना त्रास होत नाही. त्यांचा खरा कस पायऱ्यांच्या मार्गाने तळमाळ्यावरून पहिल्या माळ्यावर व पहिल्या माळ्यावरून तळमाळ्यावर बस्ते हलविताना लागत होता. या अवजड कामामुळे त्यांना कंबर, गुडघे, पाठ व मानदुखीचे आजार जडले होते. त्यांचे रोज होणारे हाल पाहता संघटनेने बस्त्यांसाठी विशेष लिफ्ट लावण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, दक्षिणेकडील इमारतीमधील पहिल्या बार रुमपुढील पायऱ्याच्या ठिकाणी विशेष लिफ्ट बसविण्यात आली आहे. लिफ्टच्या उद्घाटनप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर, सचिव अॅड. प्रफुल्ल खुबाळकर, उपाध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम पाटील, अॅड. गौरी वेंकटरमन व अन्य पदाधिकाºयांसोबत अॅड. आनंद परचुरे, अॅड. श्रीकांत सिरपूरकर आदी उपस्थित होते.
अवजड काम झाले सुकर : हायकोर्टातील बस्ता लिफ्टचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 22:09 IST
न्यायालयीन प्रकरणांच्या फाईल्सचे बस्ते पहिल्या माळ्यावर चढवणे व तेथून खाली उतरविणे या अवजड कामाकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विशेष लिफ्ट बसविण्यात आली आहे. त्या लिफ्टचे सोमवारी बस्ता कर्मचाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या लिफ्टमुळे बस्ता कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अवजड काम झाले सुकर : हायकोर्टातील बस्ता लिफ्टचे उद्घाटन
ठळक मुद्दे‘एचसीबीए’चा बस्ता कर्मचाऱ्यांना दिलासा