लाेकमत न्यूज नेटवर्क
रेवराल : चिकना शिवारातील पांदण रस्त्यावर खाेल चिखल तयार झाला असून, शेतकऱ्यांना चिखलातून फसत वाट काढावी लागते. चिखलामुळे या पांदण रस्त्यावरून बैलगाडी नेणे व पायी चालणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतात जाताना व घरी परत येताना नरक यातना सहन काराव्या लागत असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
सध्या या भागातील शेतकऱ्यांनी शेतात मिरची व कपाशीची लागवड तसेच साेयाबीन व तुरीची पेरणी केली आहे. या पिकांची मशागत करणे अत्यावश्यक असल्याने शेतात नियमित जावे लागते. शेतात जाण्यासाठी या पांदण रस्त्याला पर्यायी रस्तादेखील नाही. चिखलामुळे रस्त्याच्या दाेन्ही बाजू खाेलगट झाल्या आहे. शेतात पायी व बैलगाडी घेऊन जाणे धाेकादायक ठरत आहे. उन्हामुळे चिखल सुकल्यावर टणक येताे. त्यामुळे माणसांच्या व गुरांच्या पायांना जखमा हाेतात. रस्ता खराब असल्याने मजूरही शेतात कामाला येण्यास तयार नसतात, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.
....
रेतीची अवैध, ओव्हरलाेड वाहतूक कारणीभूत
हा पांदण रस्ता कन्हान नदी व चापेगडी-माथनी राेडला जाेडला आहे. कन्हान नदीच्या पात्रातून माेठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा केला जात असून, रेती वाहतुकीचे ओव्हरलाेड ट्रक व ट्रॅक्टर याच पांदण रस्त्याने मुख्य मार्गावर येतात. त्यामुळे या रस्त्यावर आधीच ठिकठिकाणी खाेल व माेठे खड्डे तयार झाले हाेते. पावसाळ्यात चिखल तयार झाल्याने सध्या या रस्त्यावर गुडघाभर फसत असल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले.
....
चापेगडी-माथनी राेड चिखलमय
रेती वाहतूकदार वाहनांच्या चाकांची माती चापेगडी-माथनी राेडवर पडत असून, पावसामुळे त्याचे चिखलात रूपांतर हाेते. या चिखलावरून दुचाकी वाहने स्लीप हाेत असल्याने राेज छाेटे अपघात हाेत आहेत. यासंदर्भात महसूल व पाेलीस विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या. पण, अधिकाऱ्यांचे रेती चाेरट्यांशी आर्थिक लागेबांधे असल्याने कुणीही कारवाई करीत नाही, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे.
...
पांदण रस्ता खराब झाल्याने आम्हाला शेती करणे कठीण झाले आहे. शेती जर केली नाही तर वर्षभर खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या पांदण रस्त्याची शुक्रवारी (दि. २७) कामठीच्या तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. महसूल विभागाने या समस्येवर चार दिवसात ताेडगा काढला नाही किंवा हा रस्ता दुरुस्त केला नाही तर माेठे आंदाेलन करू.
- रामरावजी डाबरे, शेतकरी, चिकना, ता. कामठी
280821\1853-img-20210828-wa0008.jpg
शेती करणे सोडायचे काय......? फोटो