शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

महिलांच्या हेल्मेट जनजागृतीसाठी देशाला गवसणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 10:59 AM

एक महिला शिकली तर अख्खे कुटुंब शिक्षित होते. त्याचप्रमाणे एका महिलेला हेल्मेटचे महत्त्व कळले तर तिचे कुटुंब हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणार नाही, हाच उद्देश ठेवून मथुरा येथील पूजा यादव देशाच्या यात्रेवर निघाली आहे.

ठळक मुद्देपूजा यादव हिचे ‘मिशन हेल्मेट’जनआक्रोशतर्फे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एक महिला शिकली तर अख्खे कुटुंब शिक्षित होते. त्याचप्रमाणे एका महिलेला हेल्मेटचे महत्त्व कळले तर तिचे कुटुंब हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणार नाही, हाच उद्देश ठेवून मथुरा येथील पूजा यादव देशाच्या यात्रेवर निघाली आहे. तेही एकटीच बाईकवर स्वार होऊन. बुधवारी ती नागपुरात आली असता ‘जनआक्रोश’च्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. भारतात दर दिवसाला विना हेल्मेट चालविणाऱ्या सुमारे ९८ दुचाकीस्वारांचा मृत्यू होतो. ही संख्या हेल्मेटचे महत्त्व सांगणारे आहे, म्हणून याची जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे पूजाचे म्हणणे आहे.पूजा हिला लहानपणापासूनच ‘बाईक’चे वेड होते. काही वर्षांपूर्वी तिच्या जवळच्या मैत्रिणीच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. त्यांनी हेल्मेट घातले असते तर वाचले असते. या घटनेने मैत्रिणीचे अख्खे कुटुंब रस्त्यावर आले. तेव्हापासून हेल्मेटविषयी जनजागृती करण्याची पूजाची इच्छा होती. पतीकडून मिळालेले प्रोत्साहन व एका ‘एनजीओ’च्या मदतीने महिलांमध्ये हेल्मेट जनजागृतीसाठी २० नोव्हेंबरपासून तिने ‘मिशन हेल्मेट’ हाती घेतले. नोएडा येथून हे ‘मिशन’ सुरू झाले.‘लोकमत’शी बोलताना पूजा म्हणाली, बाईक चालविण्याची प्रेरणा पतीपासून मिळाली. पूर्वी बाईकने लांबचा प्रवास करण्यास भीती वाटायची. परंतु आता अनुभव गाठीशी आहे. आतापर्यंत ५० हजार किलोमीटरची यात्रा केली आहे. या ‘मिशन’मध्ये महामार्गाने विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांना थांबवून त्यांना हेल्मेटविषयी माहिती देते. अपघात कुणाला सांगून येत नाही, यामुळे तुमची काळजी तुम्हीच घेण्याचे आवाहन करते. मैत्रिणीचे कुटुंब एका चुकीने कसे रस्त्यावर आले, त्याची माहिती देते. पोलिसांच्या भीतीने नव्हे तर स्वत:च्या सुरक्षेसाठी हेल्मेट घाला. हेल्मेट उच्च दर्जाचेच वापरा, अशीही पूजा म्हणाली. नागपूरमध्ये एक दिवसाचा मुक्काम करून गुरुवारी हैदराबादसाठी रवाना होणार आहे. येथून ती विजयवाडा, विशाखापट्टणम्, भुवनेश्वर, कोलकाता, लखनौला जाईल; नंतर दुसऱ्या टप्प्यात उर्वरित शहरांना भेट देऊन दिल्ली येथे समारोप होईल. बुधवारी सकाळी पूजाचे नागपुरात आगमन होताच जनआक्रोशचे अध्यक्ष डॉ. अनिल लद्धड यांनी सत्कार केला. यावेळी सचिव रवींद्र कासखेडीकर, डॉ. सुनीती देव, दिलीप मुक्केवार, प्रमेश शहारे, अशोक करंदीकर, कृष्णकुमार वर्मा, डॉ. प्रवीण लाड व जनआक्रोशचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

विना हेल्मेट ३५ हजार ९७५ दुचाकीस्वारांचा मृत्यू२०१७ मध्ये देशात रस्ता अपघातात हेल्मेट न वापरता दुचाकी चालविणाऱ्या ३५ हजार ९७५ चालकांचा मृत्यू झाला, तर ३६ हजार ६७८ दुचाकीस्वार जखमी झाले. विना सीटबेल्ट वाहन चालविणाऱ्या २८ हजार ८९६ चालकांचा मृत्यू तर ३३ हजार २६४ जखमी झाले. वाहन चालविताना मोबाईलचा वापर  तीन हजार १७२ चालकांचा मृत्यू तर तीन हजार ६६८ चालक जखमी झाले.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा