योगेश पांडे / आनंद डेकाटे ल्ल नागपूरविदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात जास्तीत जास्त जनमानस जोडण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. विदर्भासाठी जे सकारात्मक असतील अशा सर्वांना समर्थन मागण्यात येईल. अगदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीदेखील यासाठी मदत घेण्यात येईल, असे रोखठोक मत राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अॅड. श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर महाधिवक्तापदाचा राजीनामा देणाऱ्या अॅड. अणे यांनी सोमवारी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. यावेळी संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा करीत त्यांनी विविध मुद्यांवर परखडपणे मते मांडली.ज्या दिवशी मी राजीनामा दिला त्याच दिवशी संघाचे माजी अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख मा. गो. वैद्य यांनी महाराष्ट्रातून चार वेगवेगळी राज्ये निर्माण झाली पाहिजेत अशी भूमिका मांडली होती. सुयोग्य विकासासाठी लहान राज्ये व्हावीत असे मत संघश्रेष्ठींनी वारंवार मांडले आहे. विदर्भासाठी याअगोदर संघाकडे मदत मागितली होती. आता वेगळ्या विदर्भाचे आंदोलन नव्या स्वरूपात समोर येत आहे. त्यामुळे संघाकडून याबाबत नक्कीच समर्थन मागू,असे अॅड.अणे यांनी सांगितले. ‘आम आदमी पार्टी’, बहुजन समाज पक्ष, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया हे पक्ष वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ आहेत. त्यामुळे वेळ पडली विदर्भासाठी तर भाजपा, काँग्रेस या प्रस्थापित पक्षांच्या विरोधात या विदर्भवादी पक्षांची मोट बांधण्यासाठी पुढाकार घेऊ, असेदेखील अॅड.श्रीहरी अणे यांनी प्रतिपादन केले.एकत्रितपणे वेगळ्या विदर्भासाठी चळवळ उभी राहणे आवश्यक आहे. हे आंदोलन तळागाळात पोहोचले आहे. त्याला फक्त नवीन ऊर्जा देण्याची आवश्यकता आहे. लवकरच मी स्वत: संपूर्ण विदर्भ पिंजून काढणार आहे. विदर्भात शेतकऱ्यांची समस्या सर्वश्रृत आहेच. शेतकरी संघटनांचीदेखील मदत लागणार आहे. शेतकरी संघटना वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ असलेल्या सर्व अराजकीय संस्थांनी एकत्र यावे यासाठी आवाहनदेखील करणार असल्याचे अॅड.अणे यांनी स्पष्ट केले. यावेळी ‘विदर्भ कनेक्ट’चे अध्यक्ष अॅड.मुकेश समर्थ व विदर्भ राज्य आघाडीचे सचिव संदेश सिंगलकर हे उपस्थित होते.विदर्भवादी पक्षांमध्ये समन्वय साधणार४आजच्या घडीला चार ते पाच विदर्भवादी पक्ष आहेत. काही पक्षांनी विदर्भाच्या मुद्यावरून पुढील महानगरपालिका निवडणुकांमध्ये लढण्याची घोषणादेखील केली आहे. परंतु याचा फायदा प्रस्थापित पक्षांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी मी तयार असल्याचे विधानदेखील अॅड.श्रीहरी अणे यांनी केले.युवावर्गाला जोडण्यासाठी नवे तंत्र वापरणार४कुठलेही आंदोलन युवावर्गाच्या सहभागाशिवाय बळकट होत नाही हे सत्य आहे. आपल्या देशाने गेल्या काही वर्षांत हे अनुभवलेदेखील आहे. वेगळ्या विदर्भाच्या मुद्यावर तरुणाईमध्ये उत्सुकता आहे. विविध कारणांमुळे बाहेर गेलेल्या नागपूरकर तरुणांची तर वेगळा विदर्भ व्हावा हीच भावना आहे. त्यामुळे विदर्भाच्या आंदोलनात युवावर्गाला जास्तीतजास्त प्रमाणात जोडण्याची आवश्यकता आहे. चळवळीला व्यापक स्वरूप देण्यासाठी ‘आप’प्रमाणेच एकविसाव्या शतकातील नव्या प्रचार व प्रसार तंत्राचा वापर करण्यात येईल, अशी माहिती अॅड.श्रीहरी अणे यांनी दिली.
वेगळ्या विदर्भासाठी संघाचीही मदत घेणार
By admin | Published: March 29, 2016 3:48 AM