लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : आकाशझेप फाऊंडेशनच्या वतीने आम्ही भारतीय अभियान राबविण्यात येत असून, या अभियानांंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नवेगाव खैरी (ता. पारशिवनी) ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात ग्रामीण भागातील अभ्यासू, हाेतकरू व गरजू विद्यार्थ्यांना विविध शालेय उपयाेगी साहित्याचे वितरण करण्यात आले.
अध्यक्षस्थानी सरपंच कमलाकर कोठेकर हाेते तर प्रमुख पाहुणे उपसरपंच राजू पुरकाम, धम्मचारी आर्यकेतू, आयजीएमसीचे समाजसेवा अधीक्षक चेतन मेश्राम, आकाशझेपचे अध्यक्ष प्रा. अरविंद दुनेदार उपस्थित हाेते. अतिथींच्या हस्ते इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना नवनीत अपेक्षित संच, रजिस्टर, वही, पेन, मास्क, पाचवीतील विद्यार्थ्यांना गणवेश व इतर शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले.
यात राष्ट्रीय आदर्श विद्यालयाचे विद्यार्थी दीपक धुर्वे, अजय बेलवंशी, कुणाल वासनिक, स्वप्निल नराटे, करिश्मा राऊत, सुहानी राऊत, सुरेश धुर्वे, अनुराग गजभिये, खुशबू देशभ्रतार, आशिष कनोजे, आदिवासी आश्रमशाळा कोलितमारा येथील राजेश उईके, रोहित धुर्वे, अतुल कुमरे, वैशाली उईके, संजना इनवाते, लालबहादूर शास्त्री विद्यालय बाभूळवाडा येथील पायल नयले, निशांत ढोरे, हरिहर विद्यालयाचे अंजली वायवाडे, वृषभ कुरमटकर, अंकिता बारापात्रे, प्रतीक्षा मेश्राम, समीर शेख, राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे अंजली कोसरे, अभिषेक लक्षणे, श्रीराम विद्यालय रामटेकचे पीयूष रेवतकर, सेजल कळमकर, अंजली कळमकर, वंशिका सावरकर, समीक्षा सोनटक्के, प्रतीक्षा वारकर, नंदिनी पुरकाम, प्राजक्ता दुनेदार, आरोशी राऊत, गोविंद चक्रवर्ती, नकुल इनवाते, यश डायरे, नैतिक ढोरे, निहार राऊत, कार्तिक पिल्लारे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
यासाठी डॉ. सुयोग रत्नपारखी, सुमित कोठारी, अमेय परांजपे, के. मधुकर रेड्डी, तुळशीराम काळमेघ, राधेश्याम गायधने, शुभम मेश्राम यांनी विशेष सहकार्य केले. याप्रसंगी कमलाकर कोठेकर, राजू पुरकाम, धम्मचारी आर्यकेतू, चेतन मेश्राम यांचा गाैरव करण्यात आला. कार्यक्रमाला उमाजी बुरडे, सुरेश दरवई, युवराज राऊत, सुधाकर राऊत, अशोक गजभिये, अनिकेत मैंद, प्रेम राऊत, सुभाष दुपारे यांच्यासह पालकांनीही हजेेरी लावली हाेती. संचालन अभियानाचे मुख्य संयोजक साक्षोधन कडबे यांनी केले तर दिलीप पवार यांनी आभार मानले.