नागपूर: दहावी-बारावीची लेखी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे नागपूर विभाग व जिल्हास्तरावर समुपदेशन केंद्र व हेल्पलाईन सुरु होणार आहेत. १२ वीसाठी समुपदेशन केंद्र व हेल्पलाईन बुधवारपासून सुरु झाली आहेत. तर १० वीसाठी २२ फेब्रुवारी पासून सुरु होणार आहेत.
बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च दरम्यान होणार आहे. तर इयत्ता १०वीची लेखी परीक्षा १ मार्च ते २६ मार्च दरम्यान होणार आहे. या परीक्षांसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता परीक्षा वेळापत्रक, प्रवेशपत्र, विषय बदल, प्रात्यक्षिक परीक्षा व परिक्षेसंबंधी गोपनीय माहिती वगळून अन्य माहिती मिळविण्याकरिता नागपूर विभागीय मंडळाद्वारे या दोन्ही परिक्षांच्या कालावधी दरम्यान विभागीय व जिल्हास्तरावर सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत ‘समुपदेशन केंद्र’ आणि ‘हेल्पलाईन’ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे, विभागीय सचिव चिंतामन वंजारी यांनी कळविले आहे.
असे आहेत हेल्पलाईनविभागस्तरावर बारावीसाठी संपर्क अधिकारी एस. एस. बुधे : ९४०४३३९९९२, तसेच डी.बी.पाटील, ए.बी.शेंडे.-दहावीसाठी विभागस्तरावरअधिकारी व्ही. आर. देशमुख : ८८३०४५८१०९,पी.ए. कन्नमवार आणि एस.आर.अहीर.. तसेच विभागीय मंडळ कार्यालयाचे दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५५३५०७ आणि ०७१२-२५५३५०३ वरही माहिती प्राप्त करता येणार आहे.- जिल्हास्तरावरील समुपदेशन केंद्र व संबंधित अधिकारीनागपूर : विशाल गोस्वामी, शारदा महिला विद्यालय, ओमनगर ८२७५०३९२५२ आणि प्रतिमा मोरे, बालाजी हायस्कूल, हिंगणा रोड ९०२८०६६६३३)- वर्धा : पी.के. शेकार (यशवंत विद्यालय, सेलू, ९७६६९१७३३८) आणि वि.दा.पाटील. इंदिरा हायस्कूल सायलीकला, ता. सेलू ९८२३४३८२०५- भंडारा : गायत्री भुसारी (समर्थ विद्यालय, लाखनी,जि.भंडारा ९०११०६२३५५ आणि नरेंद्र चौधरी (जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडारा ९४०५५१७५४१- गोंदिया : मिलींद रंगारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया ९४०४८६०७३५ आणि एल.एच. लांजेवार, श्री. गुरुदेव विद्यामंदिर, ता. देवरी,जि.गोंदिया ७५०७०९९१३६- चंद्रपूर : सतीश पाटील, मातोश्री विद्यालय, तुकूम ९४२१९१४३५३ आणि आर.एन. रहाटे,मातोश्री विद्यालय, तुकूम ७५८८८९०१८७- गडचिरोली : डी.एम.जवंजाळ, रेणुकाबाई उके हायस्कूल, शिवराजपूर, ता.देसाईगंज ९४२१८१७०८९ तसेच ए.एल. नुतिलकंठावार, लक्ष्मीबाई कन्या हायस्कूल, ता. कुरखेडा ९४२१७३२९५६