शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र साठचा आकडा पार करणार; सायंकाळी ५ वाजेपर्यंत एवढे मतदान, अजून एक तास बाकी
2
Fact Check: मुख्यमंत्र्यांचा फेक व्हिडिओ व्हायरल;  'लोकमत'चं नाव आणि लोगो वापरून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
3
“माझा मुलगा युद्धात लढून जिंकेल याचा अभिमान, अमितचा मोठा विजय हवा आहे”: शर्मिला ठाकरे
4
रोहित नसताना जसप्रीत बुमराहच कर्णधार! मॉर्कलच्या प्रेस कॉन्फरन्समुळे चर्चांना पूर्णविराम
5
Video - "मीरापूरमध्ये रिव्हॉल्व्हर दाखवून SHO ने मतदारांना धमकावलं"; अखिलेश यादवांचा आरोप
6
पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी हल्ला; चौकी उडविली, १७ सैनिकांचा मृत्यू
7
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
8
मणिपूरमधील उग्रवाद्यांविरुद्ध सरकार काय कारवाई करणार? मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा खुलासा
9
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्राचा एक्झिट पोल येण्यास सुरुवात; मॅट्रिक्स, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
10
“‘तो’ आवाज माझा नाही, भाजपाकडून खोडसाळपणा”; बिटकॉइन स्कॅमचे आरोप नाना पटोलेंनी फेटाळले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
12
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
13
VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...
14
घसरणीचा झुनझुनवाला कुटुंबालाही फटका; २ महिन्यात १५००० कोटी गमावले; हा शेअर सर्वात जास्त पडला
15
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
16
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
17
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
18
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
19
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
20
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल

हेमलता पवार, सोहम नवघरे अव्वल

By admin | Published: August 24, 2015 2:34 AM

जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे रविवारी पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. दोन्ही गटात मुख्य तीन पुरस्कारांसह ओसीपीसी ज्युरी व प्रोत्साहन पुरस्कारही प्रदान करण्यात आलेत.

छायाचित्र स्पर्धा : आॅरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबचा उपक्रमनागपूर : आॅरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लब (ओसीपीसी)तर्फे जागतिक छायाचित्र दिवसानिमित्त आयोजित २० व्या छायाचित्र स्पर्धेतील व्यावसायिक गटात हेमलता पवार तर, हौशी गटात सोहम नवघरे यांनी अव्वल क्रमांक पटकावला. तसेच, अभिराम मेहंदळे व निरंजन डोमडे यांनी व्यावसायिक तर, रोहित बेलसरे व ऐश्वर्या हरकरे यांनी हौशी गटामध्ये अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला.जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे रविवारी पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. दोन्ही गटात मुख्य तीन पुरस्कारांसह ओसीपीसी ज्युरी व प्रोत्साहन पुरस्कारही प्रदान करण्यात आलेत. आमदार कृष्णा खोपडे, आमदार डॉ. देवराव होळी, भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव मनीष मिश्रा, माही समूहाचे व्यवस्थापकीय संचालक तुषार रावल प्रमुख अतिथी म्हणून तर, क्लबचे अध्यक्ष चेतन जोशी, सचिव राजन गुप्ता, प्रकल्प समन्वयक रमाकांत झाडे व्यासपीठावर उपस्थित होते. व्यावसायिक गटासाठी ‘आनंद’ हा विषय होता. हौशी गटाला विषयाचे बंधन नव्हते. स्पर्धेतील छायाचित्रांचे जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरी येथे १९ ते २३ आॅगस्टपर्यंत प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.(प्रतिनिधी)आमूलाग्र बदलछायाचित्र समाजाचे प्रतिबिंब असतात. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे छायाचित्रकारितेमध्ये आमुलाग्र बदल झाला आहे.-कृष्णा खोपडे, आमदार प्रचंड स्पर्धा आता छायाचित्रकारांमध्येही प्रचंड स्पर्धा वाढली आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी सर्जनशील कार्य करणे आवश्यक आहे.-डॉ. देवराव होळी, आमदार महत्त्वाचे स्थानमानवी जीवनात छायाचित्रकारांचे महत्त्वाचे स्थान आहे. आनंदाच्या प्रत्येक कार्यक्रमात छायाचित्रकार उपस्थित असतो.-मनीष मिश्रा.पुरस्कार विजेतेव्यावसायिक गट : प्रथम - हेमलता पवार (जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन पुरस्कार - रोख ११ हजार), द्वितीय - अभिराम मेहंदळे (हेरिटेज फिल्म डिजायनर्स पुरस्कार - रोख ५००० ), तृतीय - निरंजन डोमडे (श्याम कलर लॅब पुरस्कार - रोख ३०००), प्रोत्साहनपर पुरस्कार (प्रत्येकी १००१) - रामदास पद्मावार (सरला इंदाने स्मृती), अभिनव गुप्ता (श्रीधर डोर्लीकर स्मृती), अजय आगाशे (शंकर बानाबाकोडे स्मृती), प्रदीप निकम (रमेशचंद्र जोशी स्मृती), आशिष अरणकर (भय्यासाहेब झाडगावकर स्मृती), ओसीपीसी ज्युरी पुरस्कार - दिनेश तितरे (मोहनकुमार भगत स्मृती - रोख ५०००).हौशी गट : प्रथम - सोहम नवघरे (जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन पुरस्कार- रोख ५०००), द्वितीय - रोहित बेलसरे (दुर्गा फोटो लॅमिनेशन - रोख ३०००), तृतीय - ऐश्वर्या हरकरे (प्रवीण डिजिटल अल्बम - रोख २०००), प्रोत्साहनपर पुरस्कार (प्रत्येकी १००१ रुपये) - तनया पनपालिया, भैरवी दामले, हर्षद धापा, कुमार नंदाने (नत्थुराम झाडे स्मृती), आयुष अग्रवाल (रामचंद्र गुप्ते स्मृती), ओसीपीसी ज्युरी पुरस्कार - पूजा सावरकर (गंगाप्रसाद गुप्ता स्मृती - रोख २०००).