शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सर्व पवार कुटुंब तुम्हाला भेटायला लागले, ओळख दाखवायला लागले; बारामतीकरांसमोर अजितदादांची तुफान फटकेबाजी
2
इंदापुरात बंड अटळ?; पाटलांच्या प्रवेशानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्यांची मोठी घोषणा
3
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
4
ऑटोचा धक्का लागल्यावरून वाद अन् नंतर तुफान दगडफेक; अकोल्यात नेमकं काय घडलं?
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ इलॉन मस्क मैदानात उतरले; त्यांचा काय फायदा होणार? पाहा...
6
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
7
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
8
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
9
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
10
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
11
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
12
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
13
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
14
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
15
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
16
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
17
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
18
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
19
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
20
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड

‘हेपेटायटिस बी’चा धोका एचआयव्हीपेक्षा अधिक

By admin | Published: January 12, 2015 1:04 AM

भारतात ‘हेपेटायटिस बी’ने चार कोटी जणांना ग्रासले आहे. याचा धोका एचआयव्हीहून अधिक आहे. सध्या देशात एचआयव्हीबाधित २५ लाख रुग्ण आहेत, याच्या तुलनेत हेपेटायटिस बीच्या

गॅस्ट्रोकॉन-२०१५ : दोन दिवसीय परिषदेचा समारोप नागपूर : भारतात ‘हेपेटायटिस बी’ने चार कोटी जणांना ग्रासले आहे. याचा धोका एचआयव्हीहून अधिक आहे. सध्या देशात एचआयव्हीबाधित २५ लाख रुग्ण आहेत, याच्या तुलनेत हेपेटायटिस बीच्या रुग्णांची संख्या अधिक आहे. या आजाराकडे वेळीच लक्ष न दिल्यास त्यामुळे लिव्हर (यकृत) कॅन्सर होण्याची शक्यता अधिक असते. विशेष म्हणजे ‘हेपेटायटिस बी’चे विषाणू एचआयव्हीच्या १०० पटीने अधिक प्रमाणात संक्रमित होतात, अशी माहिती डॉ. दीपक अमरापूरकर यांनी दिली. मिडास मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, नागपूरच्या वतीने ‘गॅस्ट्रोकॉन-२०१५’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दुसऱ्या दिवसाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. डॉ. अमरापूरकर म्हणाले, हेपेटायिटस ‘बी’ हा गंभीर आजार असून, त्यावरील लस ही विकसित झालेली आहे. हेपेटायिटस ‘डी’ आणि ‘इ’ त्याप्रमाणात धोकादायक नाहीत. परंतु हेपेटायिटस ‘सी’ची विषाणूबाधा त्यातुलनेत गंभीर मानली जाते. हेपेटायटिस ‘सी’ची लसच उपलब्ध नाही. यामुळे हेपेटायटिस ‘सी’ विषाणूबाधेचा धोका आणखी गंभीर बनतोय, कारण या विषाणूबाधेचं निदान करणं अतिशय अवघड आहे. यकृतात हेपेटायटिस ‘सी’ची बाधा झाल्यावर कित्येक वर्षे हे विषाणू सुप्तावस्थेत राहू शकतात. पण यकृतावर याचा विपरीत परिणाम होत असतो, असेही ते म्हणाले.आज दुपारपर्यंत चाललेल्या सत्रात डॉ. प्रवीण राठी, डॉ. टी.एस. चंद्रशेखर, डॉ. मोहन रामचंदानी, डॉ. शैलेश श्रीखंडे, डॉ. कुलविंदर दुवा, डॉ. रंधीर सूद आणि डॉ. एस.के. त्यागी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. परिषदेत विदर्भ आणि मध्य प्रदेशातील जवळपास ९५० डॉक्टर सहभागी झाले होते. मिडास मेडिकल फाऊंडेशन आणि रिसर्च इन्स्टिट्यूटचे संचालक व या परिषदेचे आयोजन सचिव डॉ. श्रीकांत मुकेवार यांनी सहभागी सर्व तज्ज्ञांचे आभार मानले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ. मुकेवार यांच्यासह डॉ. वैभव गंजेवार, डॉ. भाऊ राजूरकर, डॉ. शरद देशमुख आणि डॉ. विजय वर्मा आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)दारू टाळा कावीळ बरा झाल्यानंतरही काही गोष्टींची खबरदारी घेणे गरजेचं असते. काविळीचा यकृतावर परिणाम होतो. काही लोकांचा कावीळ बरा झाल्यानंतर दारूपानाचे कार्यक्र म सुरू ठेवतात. यामुळे यकृत पूर्णत: खराब होण्याची शक्यता अधिक असते.इन्डोस्कोपीचा ३० वर्षांचा प्रवासआशियन इन्स्टिट्यूट आॅफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी, हैदराबादचे संचालक डॉ. डी. नागेश्वर रेड्डी यांनी इन्डोस्कोपीचा ३० वर्षांच्या प्रवासावर प्रकाश टाकला. पूर्वी होणारा वापर, आता त्यात झालेला बदल आणि भविष्यातील डेव्हलपमेंटवर त्यांनी मार्गदर्शन केले.