लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आयुष्यातील पहिली कमाई अनेकजण ईश्वराच्या चरणी ठेवतात, आईवडिलांना देतात. पहिली कमाई देताना त्यांच्या मनात एक वेगळीच भावना असते. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावर उतरलेल्या एका तरुणीला पहिली कमाई ठेवलेली बॅग जवळ नसल्याचे पाहून धक्का बसला. ती आक्रोश करीत होती. आईला पहिला पगार द्यायचा होता असे सांगताना तिचा दाटून येत होते. परंतु रेल्वे सुरक्षा दलाने अवघ्या काही मिनिटातच सीटीटीव्हीच्या साहाय्याने तिची पैसे असलेली बॅग शोधताच तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.मूळची भंडारा येथील रहिवासी असलेल्या कल्पनाने (बदललेले नाव) शिक्षण घेऊन नोकरीसाठी गाव सोडून अहमदाबाद गाठले. महिनाभर नोकरी करून तिने १० हजार रुपये कमविले. आयुष्यातील पहिली कमाई आईच्या हातात द्यायची या विचाराने आनंदित होऊन ती भंडाऱ्याला जाण्यासाठी रेल्वेगाडीत बसली. रेल्वेगाडी क्रमांक १२९०५ पोरबंदर-हावडा एक्स्प्रेसच्या लेडीज कोचमधून प्रवास करीत असताना ही गाडी भंडाऱ्याला थांबत नसल्यामुळे ती नागपूर रेल्वेस्थानकावर उतरली. येथून दुसऱ्या गाडीने भंडाऱ्याला जाण्याचे तिने ठरविले. गडबडीत तिची एक बॅग गाडीतच विसरली. आपली पैसे असलेली बॅग जवळ नसल्याचे पाहून तिला धक्काच बसला. तिच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली. रडतरडत तिने आरपीएफ ठाणे गाठले. आपबिती सांगितली. आरपीएफचे निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात कल्पना एकच बॅग घेऊन खाली उतरल्याचे दिसले. लगेच त्यांनी आरपीएफचे उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, केदार सिंह, शशिकांत गजभिये यांना गाडीत पाठविले. महिला कोचमध्ये तिची बॅग सुरक्षित ठेवलेली होती. बॅग ठाण्यात आणताच कल्पनाच्या जीवात जीव आला. बॅगमधील पैसे पाहताच तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. अश्रूने भरलेल्या डोळ्यांनी तिने रेल्वे सुरक्षा दलाचे आभार मानून भंडाऱ्याला निघून गेली.
अन् पहिला पगार आईला देण्याचे तिचे स्वप्न झाले पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 11:13 PM
आयुष्यातील पहिली कमाई अनेकजण ईश्वराच्या चरणी ठेवतात, आईवडिलांना देतात. पहिली कमाई देताना त्यांच्या मनात एक वेगळीच भावना असते. परंतु नागपूर रेल्वेस्थानकावर उतरलेल्या एका तरुणीला पहिली कमाई ठेवलेली बॅग जवळ नसल्याचे पाहून धक्का बसला. ती आक्रोश करीत होती. आईला पहिला पगार द्यायचा होता असे सांगताना तिचा दाटून येत होते. परंतु रेल्वे सुरक्षा दलाने अवघ्या काही मिनिटातच सीटीटीव्हीच्या साहाय्याने तिची पैसे असलेली बॅग शोधताच तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
ठळक मुद्देआरपीएफने शोधली पैसे असलेली बॅग