शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

हाय, आय एम सुनिता विलियम्स’! ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांशी थेट साधला संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 8:13 PM

सातत्याने कुठल्या ना कुठल्या प्रकल्पात व्यस्त असलेल्या ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारची सायंकाळ काहिशी वेगळी होती. संगणक विज्ञान विभागाच्या ‘स्मार्ट क्लासरुम’मध्ये बसलेल्या प्रत्येक जण रोमांचित झाला होता. मनात उत्साह, प्रश्नांची यादी अन् केव्हा तो क्षण येतो याची प्रतीक्षा होती. अखेर सायंकाळी ७ वाजता ‘एलईडी स्क्रीन’वर ती झळकली अन् जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्त्व असूनदेखील अतिशय साधेपणाने ओळख करुन दिली, ‘हाय, आय एम सुनिता विलियम्स’ ! त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि सुनितांचे उत्तर हा क्रमच सुरू झाला व विद्यार्थ्यांना अंतराळ विश्वाचे विविध पैलू नव्यानेच उलगडले.

ठळक मुद्दे ‘वेबिनार’च्या माध्यमातून अंतराळ मोहिमांचा मांडला अनुभव

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : सातत्याने कुठल्या ना कुठल्या प्रकल्पात व्यस्त असलेल्या ‘व्हीएनआयटी’च्या विद्यार्थ्यांसाठी सोमवारची सायंकाळ काहिशी वेगळी होती. संगणक विज्ञान विभागाच्या ‘स्मार्ट क्लासरुम’मध्ये बसलेल्या प्रत्येक जण रोमांचित झाला होता. मनात उत्साह, प्रश्नांची यादी अन् केव्हा तो क्षण येतो याची प्रतीक्षा होती. अखेर सायंकाळी ७ वाजता ‘एलईडी स्क्रीन’वर ती झळकली अन् जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्त्व असूनदेखील अतिशय साधेपणाने ओळख करुन दिली, ‘हाय, आय एम सुनिता विलियम्स’ ! त्यानंतर विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि सुनितांचे उत्तर हा क्रमच सुरू झाला व विद्यार्थ्यांना अंतराळ विश्वाचे विविध पैलू नव्यानेच उलगडले.‘व्हीएनआयटी’च्या ‘अ‍ॅक्सिस’ या तांत्रिक उत्सवांतर्गत संगणक विज्ञान विभागातर्फे भारतीय मूळ असलेल्या अमेरिकन अंतराळवीर सुनिता विलियम्स यांच्याशी थेट संवादासाठी ‘वेबिनार’चे आयोजन करण्यात आले होते. सुनिता विलियम्स यांनी विद्यार्थी तसेच प्राध्यापकांंना मनमोकळेपणाने अनुभव सांगितले. विविध अंतराळ मोहिमेदरम्यान आलेले अडथळे, त्यातील तांत्रिक मुद्दे, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील गाजलेले ‘स्पेस वॉक’, एक महिला असूनदेखील अंतराळात घालविलेला इतका कालावधी व त्यातून निर्माण झालेले ‘रेकॉर्ड’ इत्यादींवर त्यांनी भाष्य केले. सोबतच अंतराळ विज्ञान क्षेत्रात महिलांचा सहभाग, महिला सक्षमीकरण या मुद्यांवरदेखील त्यांनी आपली भूमिका मांडली. ‘आस्क सुनिता विलियम्स’ या स्पर्धेंतर्गत विद्यार्थ्यांना विलियम्स यांना विविध प्रश्न विचारण्याचीदेखील संधी मिळाली.तिसऱ्या ‘मिशन’साठी सुरू आहे तयारीयावेळी सुनिता विलियम्स यांनी त्यांच्या भविष्यातील योजनांबाबतदेखील माहिती दिली. सद्यस्थितीत मी ‘बोईंग’च्या ‘स्टारलाईनर’ या ‘स्पेसक्राफ्ट’च्या पहिल्या ‘पोस्ट सर्टिफिकेशन मिशन’अंतर्गत प्रशिक्षण घेत आहे. सोबतच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात त्यांच्या तिसऱ्या सर्वात लांब ‘मिशन’वरदेखील काम सुरू आहे. मी व माझे सहकारी ‘बोईंग’च्या नवीन ‘स्पेसक्राफ्ट’ प्रणालीला विकसित करण्याच्या योजनेतदेखील सहभागी आहोत. या नवीन प्रणालीमुळे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ‘क्र्यू ट्रान्सपोर्टेशन’ हे ‘राऊंडट्रीप’ पद्धतीने शक्य होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :scienceविज्ञानStudentविद्यार्थी