शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
5
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
8
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
9
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
10
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
11
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
12
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
13
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
14
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
15
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
16
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
17
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
18
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
19
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
20
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले

महावितरणचा ग्राहक होतोय हायटेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2019 00:24 IST

ऑनलाईन व्यवहाराप्रती वीज ग्राहकांचा कल दिवसेंदिवस वाढत असून, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील ११ ही जिल्ह्यात ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये तब्बल ५४ लाख १३ हजार ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून ७५१ कोटी ५३ लाख रुपयांचा भरणा केला होता; हा आकडा आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढला असून, सुमारे ८१ लाख ७५ हजार व्यवहारांच्या माध्यमातून ११९४ कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला.

ठळक मुद्देऑनलाईन वीज बिल भरणाऱ्यांच्या संख्येत भरघोस वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ऑनलाईन व्यवहाराप्रती वीज ग्राहकांचा कल दिवसेंदिवस वाढत असून, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील ११ ही जिल्ह्यात ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का दिवसेंदिवस वाढत आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये तब्बल ५४ लाख १३ हजार ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून ७५१ कोटी ५३ लाख रुपयांचा भरणा केला होता; हा आकडा आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये मोठ्या प्रमाणात वाढला असून, सुमारे ८१ लाख ७५ हजार व्यवहारांच्या माध्यमातून ११९४ कोटी रुपयांचा भरणा करण्यात आला.महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी संकेतस्थळाशिवाय, महावितरण मोबाईल अ‍ॅप, पेटीएम आणि इतरहीऑनलाईन सेवांच्या माध्यमातून वीज बिलांचा भरणा करण्यासाठी सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवांची व्याप्ती आणि सहज वापर यामुळे ग्राहकांचा कल यांच्याकडे सातत्याने वाढत आहे. शहरी ग्राहकांसोबतच ग्रामीण भागातील वीज ग्राहकही या सेवांचा लाभ मोठ्या प्रमाणात घेत असल्याचे दिसून येत असून, वीज बिल भरण्यासाठी तासन्तास रांगेत उभे न राहता अवघ्या काही मिनिटांत वीज बिलांचा भरणा करता येणे शक्य झाले आहे. याशिवाय वीज बिलाचा एसएमएस येताच त्याच लिंकवरून वीज बिल भरण्याची सुविधा असल्याने वेळीच बिलांचा भरणा केल्यामुळे ग्राहकांना विलंब आकाराचा भुर्दंडही भरावा लागत नाही. याउपर अनेक ग्राहक वेळीच बिल भरणा करून बिलाच्या रकमेत मिळणारी सवलतही मिळवीत आहेत.विदर्भातील ११ ही जिल्ह्याचा विचार करता २०१७-१८ मध्ये नागपूर शहर मंडळात ७ लाख ५७ हजार ऑनलाईन व्यवहारांतून ग्राहकांनी ऑनलाईन बिल भरणा केला होता, हा आकडा २०१७-१८ मध्ये तब्बल १० लाख २७ हजारावर गेला असून, नागपूर ग्रामीण मंडलातील ७ लाख ५७ हजाराच्या तुलनेत २०१८-१९ मध्ये १० लाख २२ हजारावर गेला आहे. याशिवाय वर्धा जिल्हातील ५ लाख १५ हजाराच्या तुलनेत ६ लाख ६७ हजार ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून ग्राहकांनी वीज बिलांचा भरणा केला आहे.भंडारा जिल्ह्यातील २ लाख ९१ हजारांच्या तुलनेत ६ लाख ९ हजार, गोंदिया जिल्ह्यातील ३ लाख ४६ हजाराच्या तुलनेत ६ लाख २० हजार, चंद्रपूर जिल्ह्यातील ५ लाख ५९ हजाराच्या तुलनेत ८ लाख ९४ हजार तर गडचिरोली जिल्ह्यातील २ लाख ५३ हजाराच्या तुलनेत ४ लाख ६९ हजार ऑनलाईन व्यवहारांच्या माध्यमातून ग्राहकांनी आपल्या वीज बिलांचा भरणा केला आहे.याचसोबत आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये अमरावती जिल्ह्यातील ५ लाख ४३ हजार व्यवहार तर २०१८-१९ मध्ये ८ लाख ६९ हजार ऑनलाईन व्यवहारातून तर यवतमाळ जिल्ह्यातीला ४ लाख १० हजार व्यवहाराच्या तुलनेत ६ लाख १० हजार व्यवहारातून ग्राहकांनी ऑनलाईन सेवांचा लाभ घेत वीजबिलांचा भरणा केला आहे. अकोला जिल्ह्यातील ३ लाख ६८ हजार व्यवहाराच्या तुलनेत ६ लाख २० हजार व्यवहारातून याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातील ८ लाख ७४ हजार व्यवहाराच्या तुलनेत १० लाख १० हजार व्यवहारातून तर वाशिम जिल्ह्यातील २ लाख २ हजार व्यवहारातून ग्राहकांनी २०१७-१८ मध्ये ऑनलाईन वीजबिल भरणा केला असताना २०१८-१९ मध्ये हा आकडा २ लाख ८५ हजार व्यवहारांपर्यंत गेला आहे. एकूणच ऑनलाईन वीजबिल भरणा करणाऱ्या ग्राहकांची वाढती संख्या बघता महावितरणची ही सेवा दिवसेंदिवस अधिकाधिक लोकाभिमुख होत असल्याचे दिसून येत असून ग्राहकांनी या सेवांचा जास्तीतजास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणtechnologyतंत्रज्ञानbillबिल