योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे मध्य भारतातील ज्ञानाचे मंदिर मानले जाते आणि येथून शिक्षणाचे संस्कार घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी राज्य व देशाला प्रभावी नेतृत्वदेखील दिले आहे. मात्र मराठीप्रमाणेच या कर्तृत्वशाली माजी विद्यार्थ्यांचादेखील बहुतेक विद्यापीठाला विसर पडला आहे. म्हणूनच की काय मराठी आवृत्तीवर माजी विद्यार्थ्यांच्या यादीत माजी राष्ट्रपती मोहम्मद हिदायतुल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश करण्याचे सौजन्यदेखील दाखविण्यात आलेले नाही. जागतिकीकरणाच्या युगात जगाला विद्यापीठाशी जोडणाºया संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीवर ‘अपडेट’च्या नावावर बोंबच आहे.नागपूर विद्यापीठाच्या संकेतस्थळाच्या इंग्रजी आवृत्तीवर बºयापैकी माहिती ‘अपडेट’ आहे. मात्र मराठी आवृत्तीकडे विद्यापीठाने अगोदरपासूनच दुर्लक्ष केले. ‘लोकमत’ने याकडे वृत्ताच्या पहिल्या भागात लक्ष वेधले. संकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीचे सखोल निरीक्षण केले असता धक्कादायक बाबी दिसून आल्या. इंग्रजी आवृत्तीवर माजी विद्यार्थ्यांच्या यादीत हिदायतुल्ला, गडकरी, फडणवीस यांच्यासोबतच माजी पंतप्रधान नरसिंहराव, माजी मंत्री डॉ.श्रीकांत जिचकार, जस्टीस चंद्रशेखर धर्माधिकारी, ‘कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस’चे कुलपती डॉ.वेदप्रकाश मिश्रा, जागतिक कीर्तीचे संगणकशास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, ‘सीएसआयआर’चे महासंचालक एम.ओ.गर्ग, अमेरिकेच्या राजकारणात ठसा उमटविणाºया स्वाती दांडेकर, वैज्ञानिक शेखर मांडे, शास्त्रीय गायक उल्हास कशालकर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. मात्र मराठीमध्ये नरसिंहराव आणि डॉ.जिचकार वगळता एकाही मान्यवराचा या यादीत उल्लेख नाही. दुर्दैवाची बाब म्हणजेप्र-कुलगुरू, कुलसचिवांबाबत माहितीच नाहीविद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रमुख अधिकाºयांची नावे व माहिती असणे अपेक्षित आहे. मात्र कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे वगळता एकाही अधिकाºयाबाबत येथून फारशी माहिती मिळत नाही. प्र-कुलगुरू, कुलसचिव यांच्या तर नावाचादेखील केवळ संपर्क या ‘लिंक’मध्येच उल्लेख आहे. कुलगुरूंचा संक्षिप्त परिचय ‘अपलोड’ करण्याची तसदीदेखील संकेतस्थळ हाताळणाºया अधिकाºयांनी घेतलेली नाही. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी हे अद्यापदेखील ‘परीक्षा नियंत्रक’च असून त्यांचे नावदेखील चुकीचे लिहिण्यात आले आहे.भारथी, देशमुख अद्यापही विभागप्रमुखचविद्यापीठाचा आणखी एक प्रताप म्हणजे निवृत्त झालेले काही प्राध्यापक अद्यापही मराठी संकेतस्थळावरील माहितीनुसार अद्यापही कार्यरत आहेत. गांधी विचारधारा विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ.के.एस.भारथी निवृत्त होऊन अनेक दिवस झाले. शिवाय डॉ.नीलिमा देशमुख यादेखील लोकप्रशासन विभागातून निवृत्त झाल्या आहेत. मात्र संकेतस्थळावर हे दोघेही संबंधित विभागाचे विभागप्रमुखच आहेत.
हिदायतुल्ला,गडकरी,फडणवीसांचा विद्यापीठाला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:46 AM
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे मध्य भारतातील ज्ञानाचे मंदिर मानले जाते आणि येथून शिक्षणाचे संस्कार घेऊन बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांनी .......
ठळक मुद्देसंकेतस्थळाच्या मराठी आवृत्तीवर उल्लेखदेखील नाही : निवृत्त प्राध्यापक अद्यापही विभागप्रमुख