लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने रेल्वेगाड्यांची कसून तपासणी करण्यात येत असून, आरपीएफ जवानांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर नागपूर रेल्वेस्थानकावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलातर्फे खबरदारी म्हणून नागपुरातून जाणाऱ्या रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात येत आहे. नागपूर रेल्वेस्थानक संवेदनशील असलेल्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वेस्थानकावर आरपीएफ जवानांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वे सुरक्षा दल आणि लोहमार्ग पोलिसांनी रविवारी रात्री संयुक्तरीत्या रेल्वेगाड्यांची तपासणी केली. केरळकडून येणाºया रेल्वेगाड्यांची कसून तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय मुंबई-हावडा गीतांजली आणि संपर्कक्रांती एक्स्प्रेसची तपासणी करण्यात आली. रेल्वेस्थानकाच्या पूर्व आणि पश्चिमेकडील भागातील बॅग स्कॅनिंग मशीनवरही प्रवाशांच्या बॅगची तपासणी करण्यात येत आहे. वेटिंग रुम, हॉटेल, आरक्षण कार्यालय, पार्किंग आणि रेल्वेस्थानकाच्या आऊटरवरही लक्ष देण्यात येत आहे. बीडीडीएस पथक आणि श्वान पथकाच्या वतीने तपासणी करण्यात येत आहे. आरपीएफच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातूनही रेल्वेस्थानकावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
नागपूर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट : श्वान पथकाकडून तपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 11:36 PM
श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेस्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. रेल्वे सुरक्षा दलाच्या वतीने रेल्वेगाड्यांची कसून तपासणी करण्यात येत असून, आरपीएफ जवानांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ठळक मुद्देरेल्वे सुरक्षा दलातर्फे रेल्वेगाड्यांची कसून तपासणी