शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार...
2
Satej Patil: सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; "दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला"
3
अटकेपार झेंडे फडकावले आमच्या मराठे शाहीने अन् इथे व्यासपीठावर मुली नाचवतायत? राज ठाकरे कुणावर संतापले?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी नॉट रिचेबल नव्हतो, सतेज पाटीलच..."; मधुरिमाराजेंच्या माघारीनंतर राजेश लाटकरांनी थेटच सांगितलं
5
कोलकाता बलात्कार प्रकरणी ८७ दिवसांनी आरोप निश्चित,दररोज सुनावणी होणार
6
धक्कादायक! मावशी गंगा स्नानाची रील बनवत राहिली अन् 4 वर्षांची चिमुकली बुडत रहिली! 2 तासांनंतर सापडला मृतदेह 
7
...तर रोहित कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होईल, केवळ एकदिवसीय सामने खेळेल; दिग्गज क्रिकेटरची मोठी भविष्यवाणी
8
कॅनडामध्ये हिंदू मंदिरावरावरील हल्ल्याचा मोदींकडून निषेध; 'ट्रुडोंनी कायद्याचे राज्य राखावे अशी अपेक्षा' 
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियाला नशिबाने साथ दिली...", पाकिस्तानच्या पराभवानंतर कर्णधार रिझवानचं विधान
10
सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या
11
video: लाईव्ह सामन्यादरम्यान कोसळली वीज; एका खेळाडूचा मृत्यू, तर अनेकजण गंभीर जखमी
12
त्याला १२ भाऊ आणि ४ बहिणी आहेत; पाकिस्तानी खेळाडूचा परिचय करुन देताना अक्रम भलतंच बोलला
13
दापोलीत सहा कदम, पर्वतीत तीन अश्विनी कदम! नावं, आडनावं 'सेम टू सेम', कुणाचा होणार 'गेम'
14
उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...
15
राज ठाकरेंचा पहिला घणाघात; पक्ष फोडीवरून एकनाथ शिंदे-अजित पवारांवर बरसले
16
सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले...
17
"...तर मीही मुख्यमंत्री व्हायला तयार"; CM महायुतीचाच होणार म्हणत, रामदास आठवले बोलून गेले 'मन की बात'!
18
...तर उद्धव ठाकरे ५ वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते; देवेंद्र फडणवीसांनी मांडलं समीकरण
19
सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले
20
Sanjay Roy : "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप

हायकोर्ट : सरकारवर चार हजार रुपये दावा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 9:17 PM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चार प्रकरणांमध्ये राज्य सरकारवर प्रत्येकी एक हजार रुपये दावा खर्च बसवला व हे एकूण चार हजार रुपये उच्च न्यायालय विधी सेवा उप-समितीकडे जमा करण्यास सांगितले. न्यायालयात दिशाभूल करणारी माहिती दिल्यामुळे सरकारला हा दणका बसला.

ठळक मुद्देदिशाभूल केल्यामुळे बसला दणका

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चार प्रकरणांमध्ये राज्य सरकारवर प्रत्येकी एक हजार रुपये दावा खर्च बसवला व हे एकूण चार हजार रुपये उच्च न्यायालय विधी सेवा उप-समितीकडे जमा करण्यास सांगितले. न्यायालयात दिशाभूल करणारी माहिती दिल्यामुळे सरकारला हा दणका बसला.जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी बेकायदेशीरपणे काढलेल्या वसुलीविरुद्ध चार केरोसीन विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. न्यायालयाने एक कायदेशीर मुद्दा उपस्थित करून वसुलीवर स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने अशा वसुलीविरुद्ध वरिष्ठ प्राधिकाऱ्याकडे अपील करण्याची तरतूद महाराष्ट्र केरोसीन डिलर्स लायसन्स ऑर्डर-१९६६ मधील क्लॉज १४ मध्ये असल्याची माहिती न्यायालयाला दिली. तसेच, याचिकाकर्त्याने ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली नाही असे सांगितले. परिणामी, २२ डिसेंबर २०१८ रोजी न्यायालयाने संबंधित याचिकाकर्त्यांवर १५ हजार रुपये दावा खर्च बसवून याचिका खारीज केल्या. तो आदेश मागे घेण्यासाठी त्या याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केले होते. अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांनी अर्जदारांची बाजू मांडून राज्य सरकारने अपीलच्या तरतुदीविषयी न्यायालयाला चुकीची माहिती दिल्याचे सिद्ध केले. त्यानंतर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी २२ डिसेंबरचा आदेश मागे घेऊन राज्य सरकारला दणका दिला. अ‍ॅड. मिर्झा यांना अ‍ॅड. गौरव काथेड व अ‍ॅड. अल्पेश देशमुख यांनी सहकार्य केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयGovernmentसरकार