शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

हायकोर्ट : ‘बीडीएस’च्या ५० जागा वाढविण्यावर निर्णय घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2019 8:14 PM

विदर्भ यूथ वेलफेयर सोसायटीद्वारे संचालित अमरावती येथील दंत महाविद्यालयाला ५० टक्के जागा वाढवून देण्यावर कायद्यानुसार निर्णय घेण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाला दिला आहे.

ठळक मुद्देडेंटल कौन्सिल ऑफ इंडियाला आदेश

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विदर्भ यूथ वेलफेयर सोसायटीद्वारे संचालित अमरावती येथील दंत महाविद्यालयाला ५० टक्के जागा वाढवून देण्यावर कायद्यानुसार निर्णय घेण्यात यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाला दिला आहे.निर्णय घेण्यापूर्वी संस्थेला सुनावणीची व निरीक्षण अहवालावर उत्तर सादर करण्याची संधी देण्यात यावी. उत्तर सादर केल्यानंतर संस्थेने ९ सप्टेंबर रोजी कौन्सिलसमक्ष हजर व्हावे. जागा वाढवून देण्याच्या अर्जावर त्यानंतर दोन आठवड्यात कायद्यानुसार निर्णय घेण्यात यावा असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. संस्थेने जागा वाढवून देण्यासाठी सादर केलेला अर्ज १३ मे २०१९ रोजी अमान्य करण्यात आला होता. कौन्सिलला महाविद्यालयाचे निरीक्षण केल्यानंतर काही त्रुटी आढळून आल्या होत्या. परंतु, वादग्रस्त निर्णय घेण्यापूर्वी संस्थेला सुनावणीची व निरीक्षण अहवालावर उत्तर सादर करण्याची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे संस्थेने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. सुनावणीनंतर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी संस्थेची याचिका मंजूर केली व कौन्सिलचा वादग्रस्त निर्णय रद्द करून वरील आदेश दिला. १९८९ मध्ये स्थापना झालेले हे महाविद्यालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्नित आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रणजित भुईभार तर, केंद्र सरकारतर्फे अ‍ॅड. सौरभ चौधरी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयhospitalहॉस्पिटल