शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कांबळे दुहेरी हत्याकांडात आरोपी अंकित शाहूला जामीन नाकारला; उच्च न्यायालयाचा दणका

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: March 14, 2023 12:54 PM

खटला अंतिम टप्प्यात पोहोचला

नागपूर : विशेष सत्र न्यायालयात प्रलंबित असलेला शहरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांडाचा खटला अंतिम टप्प्यात असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने आरोपी अंकित शिवभरण शाहू याला जामीन देण्यास नकार दिला. तसेच, त्याचे यासंदर्भातील अपील निकाली काढले.

अपीलवर न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या हत्याकांडाचा खटला निकाली काढण्यासाठी सत्र न्यायालयाला येत्या जूनपर्यंत मुदत वाढवून दिली आहे. आतापर्यंत सरकार पक्षाने सर्व साक्षीदार तपासले आहेत. याशिवाय आरोपींचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत. येत्या २३ मार्चपासून अंतिम सुनावणी निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने अंकितला जामीन दिला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट केले. परंतु, खटल्यावरील अंतिम सुनावणी लांबल्यास अंकितला पुन्हा जामीन मागण्याची मुभा देण्यात आली.

यापूर्वी अंकितने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती. परंतु, त्याला जामीन मिळाला नाही. दरम्यान, त्याने खटला लांबत असल्याचे कारण सांगून दुसऱ्यांदा जामिनासाठी प्रयत्न केला होता. गणेश शिवभरण शाहू हा या हत्याकांडातील मुख्य आरोपी आहे. त्याची पत्नी गुडिया ऊर्फ गुड्डी ही देखील आरोप आहे. ते सर्व पवनपुत्रनगर, हुडकेश्वर येथील रहिवासी आहेत. 

अशी आहे घटना

उषा कांबळे व राशी कांबळे, अशी मृतांची नावे आहेत. १७ फेब्रुवारी २०१८ रोजी आरोपी गणेश व उषा कांबळे यांच्यामध्ये भिसीच्या पैशांवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी उषा यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या दीड वर्षीय राशीचाही निर्घृण खून केला आणि त्यांचे मृतदेह उमरेड रोडवरील विहीरगावजवळच्या नाल्यात फेकून दिले, अशी तक्रार आहे. तक्रारकर्ते रविकांत कांबळेतर्फे ॲड. राजेंद्र डागा यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर