लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एका आदेशाचे पालन झाले नसल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने मंगळवारी शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांना फटकारले.गणवीर यांच्या ताब्यात असलेली शैक्षणिक कागदपत्रे व प्रशस्तीपत्रे मिळण्यासाठी महाविद्यालयातील डॉ. हरप्रित कौर यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. २७ मार्च रोजी न्यायालयाने कौर यांची मागणी पूर्ण करण्याचा आदेश गणवीर यांना दिला होता. परंतु, त्या आदेशाचे पालन करण्यात आले नाही. त्यामुळे न्यायालयाने संतप्त होऊन गणवीर यांना फटकारले. तसेच, त्यांना अवमानना नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, सरकारी वकिलाने एक संधी मागितल्यामुळे गणवीर यांना माफ करण्यात आले व कौर या कार्यालयात आल्यानंतर त्यांना तात्काळ आवश्यक कागदपत्रे देण्यास सांगितले. या आदेशाचे गणवीर यांनी पालन केले.दिल्ली येथील एम्समध्ये वरिष्ठ निवासी डॉक्टरपदासाठी पात्रता सिद्ध करण्यासाठी कौर यांना संबंधित कागदपत्रे हवी आहेत. यासंदर्भात त्यांनी रीतसर अर्ज सादर केला होता. परंतु, त्यांना कागदपत्रे देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. कौर यांच्यातर्फे अॅड. अक्षय सुदामे यांनी कामकाज पाहिले.
हायकोर्ट : दंत महाविद्यालय अधिष्ठात्यांना फटकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:00 AM
एका आदेशाचे पालन झाले नसल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर यांना फटकारले.
ठळक मुद्देआदेशाचे पालन केले नाही