हायकोर्ट : नागपुरातील यश बोरकर खून प्रकरणावर अंतिम सुनावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:51 AM2018-12-14T00:51:13+5:302018-12-14T00:51:52+5:30

नागपूर शहरातील बहुचर्चित यश बोरकर खून प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये गुरुवारपासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांचे न्यायपीठ हे प्रकरण ऐकत आहे.

High Court: In the final hearing on the case of Yash Borkar murder case in Nagpur | हायकोर्ट : नागपुरातील यश बोरकर खून प्रकरणावर अंतिम सुनावणी सुरू

हायकोर्ट : नागपुरातील यश बोरकर खून प्रकरणावर अंतिम सुनावणी सुरू

Next
ठळक मुद्देसत्र न्यायालयाने आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : शहरातील बहुचर्चित यश बोरकर खून प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये गुरुवारपासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांचे न्यायपीठ हे प्रकरण ऐकत आहे.
संतोष रामदास काळवे (२६) असे आरोपीचे नाव असून तो मूळचा दापोली (काळवे), ता. मालेगाव, जि. वाशीम येथील रहिवासी आहे. त्याने दोन लाख रुपयांच्या खंडणीसाठी ११ वर्षीय निरागस बालक साहील ऊर्फ यश नितीन बोरकर याचे अपहरण केले व त्यानंतर त्याचा निर्दयीपणे खून केला. सत्र न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केले आहे. तसेच, आरोपीने त्याच्या शिक्षेविरुद्ध अपील दाखल केले आहे.
आरोपी नागपुरातील खापरी येथे भाड्याच्या खोलीत राहून मिळेल त्या ठिकाणी मोलमजुरी करीत होता. पीडित बोरकर कुटुंबही खापरीतच राहते. आरोपीची बोरकर कुटुंबाशी व यशसोबत चांगली ओळख होती. त्याने याचाच गैरफायदा घेऊन यशचा विश्वासघात केला. १० जून २०१३ रोजी यश घराजवळच्या परिसरात मित्रांसोबत खेळत होता. दरम्यान, आरोपी मोटरसायकलने तेथे गेला व त्याने यशला चिप्स व कोल्डड्रिकचे आमिष दाखवून सोबत चलण्यास सांगितले. आरोपी ओळखीचा असल्यामुळे यश बेफिकीर होऊन त्याच्या मोटरसायकलवर बसला. त्यानंतर आरोपीने यशला मिहान उड्डाणपुलाच्या खाली नेले व तेथे त्याचा काँक्रीटच्या दगडाने ठेचून खून केला. आरोपीने यशला ठार मारण्यासाठी त्याच्यावर २२ वेळा दगडाने वार केले. त्यानंतर आरोपीने यशच्या वडिलाला जावेद खान या नावाने चारदा मोबाईल कॉल करून मुलगा पाहिजे असल्यास दोन लाख रुपये देण्याची मागणी केली. त्यामुळे प्रचंड घाबरलेल्या यशच्या वडिलाने सोनेगाव पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. आरोपीतर्फे अ‍ॅड. संतोष चांडे तर, सरकारतर्फे अ‍ॅड. संजय डोईफोडे व अ‍ॅड. कल्याणी देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

Web Title: High Court: In the final hearing on the case of Yash Borkar murder case in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.