हायकोर्ट : दोन आरोपींच्या फाशीवर अंतिम सुनावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 08:01 PM2019-08-26T20:01:06+5:302019-08-26T20:02:17+5:30

भंडारा जिल्ह्यातील बहुचर्चित प्रीती बारिया खून प्रकरणातील आरोपी अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अंतिम सुनावणी सुरू झाली आहे.

High Court: Final hearing on the hanging of two accused begins | हायकोर्ट : दोन आरोपींच्या फाशीवर अंतिम सुनावणी सुरू

हायकोर्ट : दोन आरोपींच्या फाशीवर अंतिम सुनावणी सुरू

Next
ठळक मुद्देभंडाऱ्यातील प्रीती बारिया खून प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा जिल्ह्यातील बहुचर्चित प्रीती बारिया खून प्रकरणातील आरोपी अमीर एजाज शेख व सचिन कुंडलिक राऊत यांच्या फाशीच्या शिक्षेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अंतिम सुनावणी सुरू झाली आहे. न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व पुष्पा गणेडीवाला यांचे न्यायपीठ हे प्रकरण ऐकत आहे.
३० जून २०१८ रोजी भंडारा सत्र न्यायालयाने दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा कायम करण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे तर, आरोपींनी अपील दाखल करून सत्र न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. ही घटना ३० जुलै २०१५ रोजी घडली होती. तकिया वॉर्डमध्ये बारिया यांचे घर आहे. आरोपींनी रात्री एसी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने त्यांच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर संधी पाहून प्रीती बारिया (३०) यांना डोक्यावर हातोडीने वार करून ठार मारले. दरम्यान, बारिया यांचा मुलगा भव्य (९) त्या ठिकाणी आला असता आरोपींनी त्याच्याही डोक्यावर हातोडीने वार केले. त्यामुळे भव्यला कायमचे अपंगत्व आले. त्यापूर्वी आरोपींनी दुपारी म्हाडा कॉलनीतील रवींद्र शिंदे यांच्या घरीदेखील एसी दुरुस्तीच्या बहाण्याने प्रवेश केला होता व त्यांची मुलगी अश्विनी हिच्या डोक्यावर लोखंडी हातोडीने वार केले होते. तेव्हापासून अश्विनीलाही कायमचे अपंगत्व आले आहे. एसी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करणे, संधी पाहून घरातील व्यक्तींचा खून करणे व त्यानंतर घरातील मुद्देमाल चोरून नेणे ही आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत होती. सत्र न्यायालयात २६ साक्षीदार तपासण्यात आले होते. उच्च न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. नीरज जावडे तर, आरोपींतर्फे अ‍ॅड. ओमप्रकाश गुप्ता कामकाज पहात आहेत.

Web Title: High Court: Final hearing on the hanging of two accused begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.