शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

हायकोर्ट : पूनम अर्बनच्या पाच संचालकांना दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:28 AM

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पूनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील ५.२५ कोटी रुपयाच्या घोटाळ्यात आरोपी असलेल्या पाच संचालकांना जामीन मंजूर करण्यास नकार दिला.

ठळक मुद्देजामीन देण्यास नकार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पूनम अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील ५.२५ कोटी रुपयाच्या घोटाळ्यात आरोपी असलेल्या पाच संचालकांना जामीन मंजूर करण्यास नकार दिला. त्यामुळे संचालकांनी न्यायालयाच्या परवानगीने आपापले अर्ज मागे घेतले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे संचालकांना जोरदार दणका बसला.चंद्रकांत अजाबराव बिहारे, सुभाष शुक्ला, डॉ. प्रियदर्शन नारायण मंडलेकर, अरुण लक्ष्मण फलटणकर व राजू रामभाऊ घाटोळे अशी अर्जदार संचालकांची नावे आहेत. संस्थेने ग्राहकांकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या होत्या. ते पैसे कर्ज स्वरूपात वाटप करण्यात आले होते. त्या कर्जाची परतफेड झाली नसल्यामुळे संस्था आर्थिक अडचणीत सापडली. ठेवी परत करणे बंद झाल्यानंतर ग्राहकांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपींविरुद्ध फसवणूक, विश्वासघात, कट रचणे इत्यादी गुन्ह्यांतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. आरोपींनी अवैधपणे कर्ज वाटप करून आर्थिक गैरव्यवहार केला, असे ठेवीदारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयbankबँकfraudधोकेबाजी