लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामूहिक वंदे मातरम् कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर भारताचा नकाशा चुकीचा छापण्यात आल्यामुळे दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी विविध बाबी लक्षात घेता नामंजूर केली.मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने अखंड भारत संकल्प दिवसानिमित्त १४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता सक्करदरा चौकात सामूहिक वंदे मातरम् कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर छापण्यात आलेल्या भारताच्या नकाशावर अॅड. संजय पाटील यांनी आक्षेप घेऊन उच्च न्यायालयात धाव घेतली होती. निमंत्रण पत्रिकेवर छापण्यात आलेला नकाशा हा भारताच्या कायदेशीर नकाशाचा अवमान करणारा आहे. असा अवमान करणाऱ्यांना एक ते तीन वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा करण्याची कायद्यात तरतूद आहे. तसेच, या कार्यक्रमासाठी प्रशासनाची परवानगी घेण्यात आली नाही. यासंदर्भात मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त आदींना निवेदन सादर केले होते, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या प्रकरणात आवश्यक आदेश जारी करण्यात यावेत, असे अॅड. पाटील यांचे म्हणणे होते. न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर त्यांना दिलासा देण्यास नकार दिला.
हायकोर्ट : भारताच्या नकाशावर आक्षेप, कारवाईची विनंती नामंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 12:22 AM
सामूहिक वंदे मातरम् कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर भारताचा नकाशा चुकीचा छापण्यात आल्यामुळे दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी विविध बाबी लक्षात घेता नामंजूर केली.
ठळक मुद्देअखंड भारत संकल्प दिवस