हायकोर्ट : माधुरी मडावींना अंतरिम दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 07:34 PM2019-09-27T19:34:12+5:302019-09-27T19:35:59+5:30
विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अमरावती येथील नगर रचना विभागातील सहायक संचालक माधुरी मडावी यांचा राजीनामा नामंजूर करण्याच्या वादग्रस्त निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या अमरावती येथील नगर रचना विभागातील सहायक संचालक माधुरी मडावी यांचा राजीनामा नामंजूर करण्याच्या वादग्रस्त निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने अंतरिम स्थगिती दिली आहे.
मडावी यांनी वादग्रस्त निर्णयाच्या वैधतेला रिट याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने मडावी यांना अंतरिम दिलासा दिला. तसेच, राज्य सरकारला नोटीस बजावून यावर उत्तर सादर करण्यास सांगितले. मडावी यांनी गेल्या २७ जुलै रोजी विभागीय आयुक्तांना राजीनामा दिला होता. विभागीय आयुक्तांनी तो राजीनामा राज्य सरकारकडे पाठवला होता. सरकारने मडावी यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी प्रलंबित असल्याच्या कारणावरून ११ सप्टेंबर रोजी त्यांचा राजीनामा नामंजूर केला. मडावी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी राजीनामा देत असल्याचे कारण सांगितले आहे.