लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २२ आठवड्याचा विकारग्रस्त गर्भ पाडण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील एका महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी बुधवारी त्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर याचिकाकर्त्या महिलेची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे मंडळ स्थापन करण्याचा आदेश मेडिकलच्या अधिष्ठात्यांना दिला. तसेच, येत्या २ ऑगस्ट रोजी मंडळाचा अहवाल सादर करण्यास सांगितले.आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार मंडळामध्ये गायनॉकॉलॉजीस्ट अॅन्ड ऑबस्टेट्रिक्स, पेडियाट्रिक्स, सोनोलॉजी, कार्डियालॉजी, पल्मोनोलॉजी, न्यूरोलॉजी, जेनेटिक्स, पॅथालॉजी इत्यादी विभागातील तज्ज्ञांचा समावेश राहणार आहे. याचिकाकर्तीला १ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता मंडळासमक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यानंतर मंडळ याचिकाकर्तीच्या आवश्यक तपासण्या करून तिचा गर्भपात सुरक्षित आहे की असुरक्षित याचा अहवाल देईल. याचिकाकर्तीचा गर्भ २२ आठवड्याचा झाला आहे. वर्धा येथील सरकारी रुग्णालयात २९ जुलै रोजी करण्यात आलेल्या थ्रीडी स्कॅनमध्ये तिच्या गर्भाला हृदय व फुफ्फु साचे विकार व शरीर सुजलेले आढळून आले. त्यामुळे याचिकाकर्ती व तिच्या पतीने गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. याचिकाकर्तीतर्फे अॅड. स्विटी भाटिया यांनी कामकाज पाहिले.
हायकोर्ट : विकारग्रस्त गर्भ पाडण्यासाठी आईची याचिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 9:51 PM
२२ आठवड्याचा विकारग्रस्त गर्भ पाडण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील एका महिलेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी बुधवारी त्या याचिकेवर सुनावणी केल्यानंतर याचिकाकर्त्या महिलेची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांचे मंडळ स्थापन करण्याचा आदेश मेडिकलच्या अधिष्ठात्यांना दिला. तसेच, येत्या २ ऑगस्ट रोजी मंडळाचा अहवाल सादर करण्यास सांगितले.
ठळक मुद्देवैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश