हायकोर्ट : साई मंदिरातील अतिक्रमणावर उत्तरासाठी मनपाने घेतला वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 09:47 PM2020-07-30T21:47:25+5:302020-07-30T21:48:36+5:30

वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमणावर उत्तर सादर करण्यासाठी महानगरपालिकेने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.

High Court: NMC took time to answer the encroachment in Sai temple | हायकोर्ट : साई मंदिरातील अतिक्रमणावर उत्तरासाठी मनपाने घेतला वेळ

हायकोर्ट : साई मंदिरातील अतिक्रमणावर उत्तरासाठी मनपाने घेतला वेळ

Next
ठळक मुद्देदोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करणार

लोकमत  न्यूज  नेटवर्क  
नागपूर : वर्धा रोडवरील साई मंदिर परिसरातील अतिक्रमणावर उत्तर सादर करण्यासाठी महानगरपालिकेने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दोन आठवड्याचा वेळ मागून घेतला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
अतिक्रमणाविरुद्ध श्री साईबाबा सेवा मंडळाने याचिका दाखल केली आहे. मंडळाने पी. के. बॅनर्जी व शिबाणी बॅनर्जी यांची १० हजार ८९४ चौरस फुटाची जमीन (ख. क्र. ४३/४) आणि लक्ष्मण भोयर व इतरांची ४५०० चौरस फूट जमीन (ख. क्र. ४३/६) खरेदी केली आहे. दोन्ही जमिनी विवेकानंदनगर येथे आहेत. या जमिनीच्या काही भागावर ९ व्यक्तींनी अतिक्रमण करून दुकाने बांधली आहेत. १९ मार्च १९९९ रोजी नागपूर सुधार प्रन्यासने अवैध बांधकाम पाडण्याची नोटीस बजावल्यानंतर या व्यक्तींनी दिवाणी न्यायालयात दावे दाखल केले होते. परंतु, त्यांना संबंधित जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करता आला नाही. दरम्यान, १ जानेवारी २०२० रोजी महानगरपालिकेने सर्वांना नोटीस बजावून जमीन रिकामी करण्याचे निर्देश दिले. परंतु, पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही असे मंडळाचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. तुषार मंडलेकर तर, मनपातर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी कामकाज पाहिले.

Web Title: High Court: NMC took time to answer the encroachment in Sai temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.