हायकोर्ट : अशोक नेते, सुनील मेंढे यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 08:10 PM2019-07-23T20:10:32+5:302019-07-23T20:23:35+5:30

लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघाचे खासदार अशोक नेते व भंडारा-गोंदिया मतदार संघाचे खासदार सुनील मेंढे यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणात नेते, मेंढे, भारतीय निवडणूक आयोग व निवडणूक निर्णय अधिकारी यांना नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

High Court: Notice to Ashok Nete, Sunil Mendhe | हायकोर्ट : अशोक नेते, सुनील मेंढे यांना नोटीस

हायकोर्ट : अशोक नेते, सुनील मेंढे यांना नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीला आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघाचे खासदार अशोक नेते व भंडारा-गोंदिया मतदार संघाचे खासदार सुनील मेंढे यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणात नेते, मेंढे, भारतीय निवडणूक आयोग व निवडणूक निर्णय अधिकारी यांना नोटीस बजावून चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
प्रकरणावर न्यायमूर्ती रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे यांनी नेते तर, कारू नान्हे यांनी मेंढे यांच्याविरुद्ध निवडणूक याचिका दाखल केली आहे. निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आल्या. त्यामुळे झालेले मतदान व मोजण्यात आलेले मतदान यात फरक आढळून आला. त्याचा फायदा विजयी उमेदवारांना मिळाला. तसेच, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन केले नाही. त्यामुळे या दोन्ही खासदारांची निवडणूक रद्द करून दोन्ही मतदार संघात नव्याने निवडणूक घेण्यात यावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. निहालसिंग राठोड तर, निवडणूक आयोगातर्फे अ‍ॅड. नीरजा चौबे यांनी कामकाज पाहिले.

 

 

Web Title: High Court: Notice to Ashok Nete, Sunil Mendhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.