हायकोर्टाची सेंट्रल बँक ऑफ इंडियाला नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 08:51 PM2019-09-26T20:51:08+5:302019-09-26T20:52:16+5:30

मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विलफुल डिफॉल्टर घोषित करण्यात आलेल्या कर्जदाराच्या याचिकेवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाला नोटीस बजावून १५ नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

High court Notice to Central Bank of India | हायकोर्टाची सेंट्रल बँक ऑफ इंडियाला नोटीस

हायकोर्टाची सेंट्रल बँक ऑफ इंडियाला नोटीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने विलफुल डिफॉल्टर घोषित करण्यात आलेल्या कर्जदाराच्या याचिकेवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाला नोटीस बजावून १५ नोव्हेंबरपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.
मनीष मेहता असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. बँकेने २९ जून २०१९ रोजी वर्तमानपत्रामध्ये नोटीस जारी करून मेहता यांना विलफुल डिफॉल्टर घोषित केले. त्यावर मेहता यांचा आक्षेप आहे. ही कारवाई करताना नोटीस देण्यात आली नाही. तसेच, सुनावणीची संधी देऊन म्हणणे ऐकून घेण्यात आले नाही असे मेहता यांचे म्हणणे आहे. वादग्रस्त कारवाई अवैध ठरवून रद्द करण्यात यावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अतुल पांडे यांनी कामकाज पाहिले.

 

Web Title: High court Notice to Central Bank of India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.